Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Food poisoning solapur बोरगाव येथे अन्नातून सातजणांना विषबाधा; कोंडीत पोहताना तरुणाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Food poisoning solapur बोरगाव येथे अन्नातून सातजणांना विषबाधा; कोंडीत पोहताना तरुणाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/05/16 at 9:49 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● मल्लिकार्जुन नगरात विवाहित इसमाची गळफास घेऊन आत्महत्यास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● कोंडी येथे पोहताना तरुणाचा विहिरीत मृत्यू

सोलापूर – घरात जेवण केल्यानंतर उलट्या आणि जुलाबाची लागण झाल्याने ७ जणांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना देशमुख बोरगाव (ता.अक्कलकोट) येथे आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. Food poisoning in Borgaon; Young man dies while swimming in Kondi Solapur crime

इमाम बागवान (वय १०वर्षे ) अबू सुफियान बागवान (वय १२) तोसिफ बागवान (वय १४)  राजअहमद बागवान (वय ४०) रहमान बागवान (वय ७३) अब्दुल बागवान (वय ७१) आणि सैपन बागवान (वय ३० सर्व रा.देशमुख बोरगाव) अशी लागण झालेल्या रुग्णांची नावे आहेत. सकाळी आठ वाजेच्या सुमारास सर्वांनी जिलानी बागवान यांच्या घरात जेवण केले होते. त्यानंतर त्यांना उलट्या-जुलाब होत असल्याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

● मल्लिकार्जुन नगरात विवाहित इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरात राहणाऱ्या शरणप्पा इरण्णा बनशेट्टी (वय ४६) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रविवारी (ता. 15) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

शरणप्पा बनशेट्टी याचा मृतदेह सकाळी १० वाजेच्या सुमारास छताच्या लोखंडी हुकाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताच्या पश्‍चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तो इलेक्ट्रिशियन चे काम करीत होता. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

● कोंडी येथे पोहताना तरुणाचा विहिरीत मृत्यू

सोलापूर – विहिरीत पोहताना पाण्यात बुडाल्याने अजय प्रकाश चव्हाण (वय १९ रा.कोंडी ता.उत्तर सोलापूर) हा तरुण मरण पावला. ही दुर्घटना काल रविवारी (ता. 15) दुपारच्या सुमारास घडली.

अजय चव्हाण हा दुपारी एक वाजेच्या सुमारास गावातील मच्छिंद्र नीळ यांच्या शेतातील विहिरीत मित्रासोबत पोहायला गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाला. त्याला विहिरीतून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला.

मयत अजय चव्हाण हा एकुलता होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. वडील प्रकाश चव्हाण हे मजुरी करतात. तो नुकताच बारावी उतीर्ण झाला होता. अजय चव्हाण याने पोलिस होण्याचे स्वप्न बाळगून ॲकॅडमी जॉईन केला होता अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

 

You Might Also Like

एमआयडीसी आग – दुर्घटना होऊ नयेत यासाठी उपसमिती गठीत करण्याचे निर्देश

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार

उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी

सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख

जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी

TAGGED: #Food #poisoning #Borgaon #Youngman #dies #swimming #Kondi #Solapur #crime, #सोलापूर #बोरगाव #अन्न #सातजण #विषबाधा #कोंडी #पोहताना #तरुण #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Devendra fadanvis corporator – ‘बाबरी पाडायला गेलो होतो, तेव्हा मी नगरसेवक होतो’
Next Article Ex mla Dilip Mane दिलीप माने यांची ‘स्वारी’ पुन्हा दक्षिणेच्या ‘दारी’; सर्वांना सोबत घेऊन जाणे होणार हिताचे

Latest News

एमआयडीसी आग – दुर्घटना होऊ नयेत यासाठी उपसमिती गठीत करण्याचे निर्देश
सोलापूर May 21, 2025
नॅशनल हेरॉल्ड : राहुल,सोनियांना 142 कोटींचा लाभ
देश - विदेश May 21, 2025
पाकिस्तान: सिंधू नदीच्या पाण्यावरून गोंधळ, निदर्शकांनी गृहमंत्र्याचे घर जाळले
देश - विदेश May 21, 2025
छत्तीसगड : बसवा राजूसह 30 नक्षलवादी ठार
Top News May 21, 2025
कोल्हापूरमध्ये तिघांना कोरोनाची लागण; एका रुग्णाला डिस्चार्ज
महाराष्ट्र May 21, 2025
पुतिन यांनी शांतता चर्चेला विलंब केला तर रशिया चर्चेतून बाहेर पडू शकतो – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री
देश - विदेश May 21, 2025
राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा
महाराष्ट्र May 21, 2025
उष्णतेचा धोका : देशातील दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश
महाराष्ट्र May 21, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?