सोलापूर : मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त पोस्टचे समर्थन करणारे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंगावर धावून गेले. ही घटना आज सोलापुरात घडली. काय घडली घटना. वाचा सविस्तर पणे नेमके काय झाले. In Solapur, NCP activist Sadabhau Khot
सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. दरम्यान, आपण केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन केले नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. सदाभाऊ खोत सध्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सदाभाऊ आणि सोबतचे कार्यकर्ते भेदरून गेल्याचे पाहायला मिळाले. मी केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त पोस्टचे समर्थन केले नाही. ती न्यायालयात कणखरपणे उभी राहिली हे सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो, अशी सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली.
सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला. केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. चितळे अटकेत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकीच्या वक्तव्याचे समर्थन केले. सदाभाऊ सोमवारी दुपारी दोन वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/542063150804752/
राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रशांत बाबर, विद्यार्थी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांच्यासह कार्यकर्ते टाळ मृदुंग घेऊन विश्रामगृहात पोहोचले. सदाभाऊंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊंच्या बॉडीगार्डने त्यांना रोखले. बराच वेळ झटापट झाली. बाहेर आल्यानंतर ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध निदर्शने केली.
□ सदाभाऊ काय म्हणाले ….
अभिनेत्री केतकी चितळे केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना आता सदाभाऊ खोत यांनी मात्र तिला समर्थन दिलेलं आहे.
मात्र, माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचे समर्थन केले आहे. त्यांनी केतकीचा मला अभिमान आहे, असे म्हटले आहे. केतकी चितळे या प्रकरणानंतर सध्या पोलीस कोठडीत आहे.
केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
स्वतःवर टीका केली की सगळे आठवते. सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करताना तुमची नैतिकता कोठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर वेगळा शब्द वापरत टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती. अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करताच त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
शकुनी मामांनी सतरंजीवर चाली टाकलेल्या आहेत. जनतेच्या बाजूने बोलल्यानंतर सरकार आवाज दाबते आहे, अशी टीका खोत यांनी केली. सरकार कट कारस्थान करणारे कौरवाची फौज आहे. कंसाचा वध करायला श्रीकृष्ण रुपी देवेंद्र फडणवीस जन्माला आले आहेत. तुमच्या बापांचा बाप देवेंद्र फडणवीस आहेत. सरकार माझी जेलवारी करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. त्यांनी मला काही फरक पडणार नाही. 20 मे च्या सभेत सरकारचे षडयंत्र उघडे करणार, त्यानंतर ते मला अडकवणार हे नक्की, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/541827730828294/