● महागाईने ग्रामीण भागातील बलुतेदारीला पुन्हा “अच्छे दिन”
पेनूर / प्रदिप शेटे : रेशन धान्य दुकानातून २०१४ पासून केरोसिन हद्दपार झाल्यानंतर देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी ‘उज्वला’ योजना आली. मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांवर अर्थात उज्ज्वलावर पुन्हा लाकडाची मोळी डोक्यावर घेण्याची पाळी आली आहे. Ujjwala again took a wooden bundle and left .. !! Inflation makes rural Balutedari expensive “good day” gas cylinders again
उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळतो. सुरवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतरही सबसिडी वाढलेली नाही. त्यामुळे जवळपास लाखो ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी मोळी घेऊन निघाल्याचे चित्र मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे.
‘चूल आणि मुल’ एवढ्यापर्यंतच मर्यादित असलेली महिला शिक्षणाच्या जोरावर पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहे. हातावरील पोट असलेल्या महिलांना महागाईच्या चटक्याने व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला सबसिडी अधिक मिळत असल्याने कनेक्शनची संख्या भरमसाठ वाढली. मात्र, सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्यात आल्याने योजना कुचकामी ठरली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/541818407495893/
सध्या गॅस सिलिंडरने हजारी पार केल्याने व त्या प्रमाणात ग्रामीण भागातील उत्पन्न न वाढल्याने सिलिंडर घेताना आर्थिक जुळवाजुळव करताना उज्ज्वलाच्या नाकीनऊ आले आहे. हातावरील पोट असलेल्यांना तेवढी रक्कम देऊन सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
महागाईने उच्चांक गाठला असल्याने तसेच गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या गॅस भाववाढीने चुलीच्या वापराचे प्रमाण अधिक झाले आहे. प्रचंड वाढणाऱ्या महागाईने ग्रामीण भागातील बलुतेदारीला पुन्हा अच्छे दिन येणार असे दिसत असून चुलीच्या निर्मितीचे काम कुंभार दादांनी हातात घेतल्याचे दिसत आहे.
□ गड्यां आपली सरपणाची चुलंच बरी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या उज्वला योजनेअंतर्गत वर्षाकाठी १२ सिलेंडर व त्यावर मिळणारी तीनशे रुपयांची सबसिडी मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा गड्या आपली सरपणाची ‘चुल’च बरी असा सूर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून निघू लागला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/541932054151195/