Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन; भाजप प्रवक्ते संबित पात्रांनी व्यक्त केला शोक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन; भाजप प्रवक्ते संबित पात्रांनी व्यक्त केला शोक

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 9:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. गाजियाबाद त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांना बुधवारी संध्याकाळी टीव्ही चर्चेदरम्यानच हृदयविकाराचा झटका आला असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस नेते राजीव त्यागी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गाझियाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालली. काँग्रेस सचिव डॉ. विनीत पूनिया यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही ही माहिती मिळाल्यानंतर शोक व्यक्त केला. त्यागी यांनी बुधवारी साडेचारच्या सुमारास आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले होते. राजीव त्यागी आज सायंकाळी पाच वाजता आज तक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. स्वत: त्यागी यांनी ट्विट करुन त्याबाबत माहिती दिली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राजीव त्यागी यांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळासह त्यांचे कुटुंबीय आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेस पक्षासह राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाचा एक फर्डा प्रवक्ता अशी त्यांची ओळख होती. टीव्ही चॅनल शो, थेट चर्चा आणि विविध व्यासपिठांवरुन राजीव त्याही हे काँग्रेस पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडत.

निधनाबद्दल माहिती देताना डॉ. पूनिया यांनी ट्वीट केले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव त्यागी राहिले नाहीत. त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांविषयी माझ्या मनापासून संवेदना आहेत. राजीव त्यागी यांनी भाजपच्या संबित पात्रांशी त्यांनी केलेली अनेक चर्चा अत्यंत धारदार होत असत. ते तथ्यपूर्ण मुद्दे ठेवण्याबरोबरच काँग्रेसला अनोख्या मार्गाने पाठिंबा देण्यासाठीही प्रसिद्ध होते.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #काँग्रेसप्रवक्ता #राजीवत्यागी #निधन #ट्वीट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात आज मृत्यू नाही तर 30 बाधित रूग्णांची वाढ
Next Article मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 जणांच्या नातेवाईकांना मिळणार एसटी महामंडळात नोकरी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?