□ पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकले विहीरीत
□ आरोपींना ७ दिवसाची कस्टडी
श्रीपूर : जांबुड (ता. माळशिरस) येथील सेक्शन नंबर १५ येथील ११ मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याचे सुमारास भुसनर यांचे शेती गट नंबर ४९१ मधील एका विहीरीजवळ जांबूड येथे मयत झाल्याने अकलूज पोलिस स्टेशन अ. म. नं ४१/२२ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. In time, the son killed his mother for money; Grandmother’s murder for marriage in Solapur
फिर्यादीची पत्नी सुरेखा तुकाराम बाबर (वय ६५ ) हिला माझा मुलगा प्रदीप तुकाराम बाबर तसेच सुन मोनाली प्रदिप बाबर दोघे १५ सेक्शन जांबूड (ता माळशिरस) यांनी जमीन विकून आलेल्या पैशाचे तसेच जांबूड येथील जमिनीचे कारणावरून आई सुरेखा तुकाराम बाबर यांच्या डोक्यात दगड घालून मारुन टाकले. हा सदर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत विहीरीत टाकले, अशी तक्रार तुकाराम बाबर (वय ७० ) यांनी अकलुज पोलिस स्टेशन येथे दिली आहे.
अकलुज पोलिस स्टेशनला गु. र. नं. ३४९/२०२२ कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तपास अप्पर पोलीस अधीक्षक हेमंत जाधव, अकलूज पोलिस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस अधिकारी सारीका शिंदे, ए. एस. आय. बाळासाहेब पानसरे, हेड कॉन्स्टेबल किशोर गायकवाड यांनी तपास केला.
आरोपींना ताब्यात घेऊन न्यालयासमोर उभे केले असता त्या नवरा बायकोला ७ दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधिकारी सारीका शिंदे या करीत आहेत.
□ लग्नासाठी नातवाने केला आजीचा खून
सोलापूर : लग्न का लावून देत नाही म्हणून नातवाने आजीच्या डोक्यात काठीने मारून तिचा खून केल्याची घटना शेळगी परिसरातील आदर्श नगरात घडली.
शेळगी येथील मित्र नगरात राहणाऱ्या मालनबी हसनसाब नदाफ (वय ७०) यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सलीम जहाँगीर नदाफ (वय २५)असे त्या नातवाचे नाव असून जोडभावी पेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/542211894123211/
सलीमच्या आईचा तो लहान असतानाच मृत्यू झाला होता. वडिलांनीही दुसरे लग्न केल्याने त्याचा सांभाळ आजी करीत होती. कर्नाटकातील जिरंकली येथून आजीने त्याला सोलापुरात बोलावून घेतले होते. याठिकाणी तो काहीच काम करीत नव्हता. माझे लग्न करून दे म्हणून तो आजीकडे सारखा तगादा लावत होता. आजीने त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे कर्नाटकला जाण्यासाठी तो आजीला पाचशे रुपये मागत होता. आजी पैसेही देत नसल्याच्या रागातून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत फिरोज शकूर नदाफ (वय 25, रा. आदर्श नगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम जहाँगीर नदाफ (रा. जिरंकली, कर्नाटक सध्या आदर्शनगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालनबी हसनसाब नदाफ (वय 70, रा. आदर्शनगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. 14 मे रोजी सायंकाळी फिरोज नदाफ हे घरात झोपले होते. त्यावेळी फिरोज यांची मावस आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या होत्या. त्यावेळी फिरोज याच्या मामाचा मुलगा सलीम नदाफ याने मालनबी यांना तु माझे लग्न का लावून देत नाही, उगाच कर्नाटक येथून बोलावून का घेतले? असे म्हणून मालनबी यांच्या डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले.
त्यावेळी फिरोज, त्याची बहिण व बहिणीचा पती यांनी जखमी मालनबी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरु असताना मालनबी यांचा मृत्यू झाला. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे पुढील तपास करीत आहेत. खून करणार्या नातवाला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/542214614122939/