सोलापूर : वाळवा (जि. सांगली) येथे सुरू असलेल्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेत लोटस स्पोर्ट्स सांगली विरुद्ध शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर आणि नवमहाराष्ट्र संघ पुणे विरुद्ध विहंग मंडळ ठाणे असे उपांत्य लढती होतील. State Invited Kho Kho Competition: Sangli, Pune, Thane and Mumbai Suburbs in the semi-finals
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाने सांगलीत वाळवा येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत आकाश तोगरे ( २.३०, २.०० मिनिटे संरक्षण) व आकाश कदम (१.३० मिनिटे नाबाद पळती व ३ गुण) यांच्या शानदार खेळीमुळे ठाणे संघाने वेळापूर ( जि. सोलापूर) येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाच्या १३-१२ असा ६.३० मिनिटे राखून पराभव केला. सोलापूरचा अष्टपैलू रामजी कश्यप याने आपल्या धारधार आक्रमणात ६ गडी टिपले. परंतु संरक्षणात त्याला ठाणे संघाने ५० सेकंदात टिपले.
दुसऱ्या सामन्यात लोटस स्पोर्ट्स क्लब सांगलीने विद्यार्थी क्रीडा केंद्र मुंबई उपनगरला २०-१९ असे १.२० मिनिटे राखून नमविले. अष्टपैलू कामगिरी करणारा सुरज लांडे (२.१०,१.४० मिनिटे पळती व ५ गुण) त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/542475014096899/
मुंबईच्या आयुष गुरव व विश्वजीत कांबळे याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली. आयुषने ५ गडी बाद करीत १.३० मिनिटे तर विश्वजीतने २.१०, १.१० मिनिटे पळती व ४ गडी बाद केले.
अन्य एका सामन्यात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने कुपवाडच्या (जि. सांगली) राणा प्रताप तरुण मंडळावर १७-१५ असा ६मिनिटे राखून सहज विजय मिळविला. पुण्याचे सुयश गरगटे (१.५०,१.४० मिनिटे पळती व २गुण) व रुद्र थोपटे ( ५ गुण) हे त्यांच्या विजयाचे मानकरी ठरले. कुपवाडच्या मल्लिकार्जुन हसूरची (१.१०,१.३० व २ गुण) अष्टपैलू खेळी अपुरी पडली
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगरने ग्रिफीन जिमखाना ठाणे संघावर २२-२० अशी २ गुणाने मात केली.मुंबई उपनगरच्या निहार दूबळे याने आपल्या धारदार आक्रमणात ७ गडी टिपले. ऋषिकेश मुरचावडे याने २.१० मिनिटे पळती करीत ४ गुण मिळविले. ठाणेच्या संकेत कदम (१.०० मिनिटे व ५ गुण) याने एकाकी लढत दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/542603154084085/