□ ठाणेच्या विहंग मंडळावर मात, पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ तृतीय
सोलापूर : सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे सुरू झालेल्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेत मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकाविले. Sangli State Invited Kho Kho Competition: Mumbai Suburbs Shirsekars Mahatma Gandhi Sports Club Wins
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने चुरशीच्या लढतीत ठाणेच्या विहंग मंडळास २१-१६ असे ५ गुणांनी हरविले. मध्यंतराच्या ९-९ या बरोबरीनंतर मुंबई उपनगरने सामना खेचून आणला.
अष्टपैलू कामगिरी करणारे अनिकेत पोटे (१.२०, १.०० मिनिटे संरक्षण व ५ गुण), ओमकार सोनवणे ( १.२०, १.४०मि. व ४ गुण) हे त्यांच्या विजेतेपदाचे शिल्पकार ठरले. ठाणेच्या गजानन शेंगाळ (१.१०, १.२० मिनिटे व ४ गुण) व आकाश साळवे ( १.४०, १.२० मिनिटे व २गुण), लक्ष्मण गवस (१.२०, १.०० व २ गुण) यांची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/543222764022124/
तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात पुण्याचा नवमहाराष्ट्र संघाने सांगलीच्या लोटस क्लबवर १६-१२ असा ५.४० मिनिटे राखून विजय मिळविला. पुण्याच्या रुद्र थोपटे याने आपल्या धारदार आक्रमणात ५ गडी टिपले. प्रतीक वाईकर याने २.०० मिनिटे व राहुल मंडल याने १.४०, १.५० संरक्षणाची बाजू सांभाळली. सांगलीच्या सुरज लांडे ( १.४०,१.१० मिनिटे पळती) व अरुण गुनकी (१.१०,१.१०,१.१० मिनिटे व २गुण) यांची खेळी अपुरी पडली.
पारितोषिके वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभवकाका नायकवाडी, उपविभागीय अधिकारी संपत खीलारी, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.
वैयक्तिक पारितोषिक विजेते : संरक्षक : लक्ष्मण गवस (ठाणे), आक्रमक : निहार दुबळे, अष्टपैलू : ओमकार सोनवणे ( दोघे मुंबई उपनगर).
https://www.facebook.com/109399567404448/posts/542766500734417/
वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, 13 जिल्ह्यांना अलर्ट
#सुराज्यडिजिटल
#rain #rainfall #पाऊस #solapur #rainday #surajyadigital #अलर्ट #Alert #sangali #Nanded #surajyadigital
■ महाराष्ट्रातल्या काही भागात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 19 मे पर्यंत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.