मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतले आहेत. यामध्ये मराठा समाजबांधवाविषयीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 व्यक्तींच्या नातेवाईकांस एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी महत्त्वाचे निर्णय आलेले आहेत. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षी एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणाच्या परिणामी बाधीत झालेल्या वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाचे भरणा केलेल्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.