Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Cooking gas expensive पुन्हा आज स्वयंपाकाचा गॅस महागला, हॉटेलचे जेवण आणखी महागणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

Cooking gas expensive पुन्हा आज स्वयंपाकाचा गॅस महागला, हॉटेलचे जेवण आणखी महागणार

Surajya Digital
Last updated: 2022/05/19 at 10:02 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ बालगंधर्व पाडण्यास विरोध, आज कलाकारांचे आंदोलन

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे देशात घरगुती सिलिंडरच्या किमती 1000 रुपयांपेक्षा जास्त झाल्या आहेत. याआधी 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता यात 3.50 रुपयांची पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत 14.2 किलोच्या सिलिंडरचे दर 1003 रुपये झाले आहे. Cooking gas is expensive again today, hotel meals will be even more expensive

इंधनात सीएनजी, पीएनजी, एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत. एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला झटका बसला आहे.

गेल्या दीड महिन्यात सीएनजीच्या दरात चारदा वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर पंधरा दिवसांमध्ये दोनदा वाढवण्यात आले आहेत. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी तब्बल एक हजार रुपयांपेक्षाही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याचा परिणाम हा सर्वसामांन्यांच्या बजेटवर झाला आहे.

व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर झपाट्याने वाढत आहेत. एक मे रोजीच व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती. आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर आठ रुपयांनी वाढवले आहेत. व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ पहात आता हॉटेलचे जेवण आणखी महाग होण्याची शक्यता आहे. महागाई गेल्या 9 वर्षातील उच्चस्थरावर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आता गॅस दरवाढीने देखील सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. आज गुरुवारी जारी करण्यात आलेल्या घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या दरानुसार मुंबई आणि राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरचे दर 1 हजार 3 रुपये इतके झाले आहेत. कोलकातामध्ये या गॅसचा दर 1,029 रुपये इतका आहे. तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1018 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. या आधी 7 मे रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

गॅस सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली असून, व्यवसायिक सिलिंडर देखील आठ रुपयांनी महागला आहे. यापूर्वी सात मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांमधील आज करण्यात आलेली ही दुसरी दरवाढ आहे. त्यापूर्वी एक मे रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. आज व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.

आता 19 किलोचा सिलेंडर दिल्लीत 2354, कोलकात्यात 2454, मुंबईत 2306 आणि चेन्नईत 2507 रुपयांना विकला जात आहे.
1 मे रोजी त्यात सुमारे 100 रुपयांची वाढ झाली होती. त्याच वेळी, मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ 2012 रुपये होती. 1 एप्रिलला ते 2253 वर आणि 1 मे रोजी 2355 रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षभरात व्यावसायिक सिलिंडरचे दर 750 रुपयांनी वाढले आहेत.

 

□ बालगंधर्व पाडण्यास विरोध, आज कलाकारांचे आंदोलन

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध सुरु झाला आहे. विरोध करण्यासाठी आज कलाकार एकत्र येऊन सकाळी 10 वाजता आंदोलन करणार आहेत. पुण्यात पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे सभागृह उभे राहिले होते. मात्र पुनर्विकासासाठी हे पाडले जाणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे.

 

You Might Also Like

पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय

ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार

पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह १२ शहरात ५० ड्रोन हल्ले

उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, ६ जणांचा मृत्यू तर 1 जखमी

TAGGED: #Cooking #gas #expensive #again #today #hotel #meals #more #expensive, #पुन्हा #आज #स्वयंपाक #गॅस #महागला #हॉटेल #जेवण #सरकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Akkalkot अक्कलकोट : 42 गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी 34 कोटींच्या योजनेस प्रशासकीय मान्यता
Next Article उजनीचे पाणी पळवल्यास राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही : आडम मास्तर

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?