नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. रोड रेज प्रकरणी त्यांना 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 1988 मध्ये पटियालात पार्किंगच्या वादावरून सिद्धू यांनी एका वृध्दाला मारहाण केली होती. त्यात त्या वृध्दाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सिद्धू यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला सिद्धू यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. Argument over parking: Navjot Singh Sidhu jailed, Supreme Court verdict
रोड रेज प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याच्या नवज्योत सिंग सिद्धूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे 2018 च्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. या आदेशानुसार सिद्धूला पंजाब पोलीस ताब्यात घेणार आहेत. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूंना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/543447770666290/
त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण 34 वर्ष जुने आहे. नवज्योत आणि त्याच्या मित्राची पटियाळा येथील कार पार्किंगवरून वाद झाला. या वादात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीमध्ये गुरनाम सिंग नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तत्पूर्वी पंजाब-हरयाणा न्यायालयाने सिद्धू यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षांचा कारावास ठोठावला होता, तर सर्वोच्च न्यायालयाने या आरोपातून सिद्धू यांना मुक्त करत एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
□ सागर मीठ कारखान्याची भिंत कोसळली; 12 कामगारांचा मृत्यू, 18 जखमी
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हलवद येथे सागर मीठ कारखान्याची भिंत कोसळून पाच महिलांसह बारा कामगारांचा मृत्यू झाला आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 30 कामगार दबले गेले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/543339027343831/