Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गोव्यातून लहान बाळ चोरणारा इसम अकलूज पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पोलिसी खाक्या दाखवता झाला कबूल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

गोव्यातून लहान बाळ चोरणारा इसम अकलूज पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पोलिसी खाक्या दाखवता झाला कबूल

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 10:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अकलूज : अंदाजे वर्षाचे लहान बाळ संशयास्पदरित्या घेऊन फिरणाच्या इसमास अकलूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर बाळ कोणाचे आहे याबाबत तपास चालू आहे. पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला आहे. मात्र बाळ कोणाचे आहे हे तपासण्यासाठी तपास पथक गोव्याला जाणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ९ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३० वाजता पोकॉ. संदेश रोकडे यांना चेतन इश्वर सोलंके (रा. विजयनगर कॉलनी, अकलूज) यांचा फोन आला की, मार्केट कमिटी अकलूज येथील गाळ्याच्या पत्राशेडमेध्ये एक संशयास्पद इसम एका लहान बाळासह आढळून आला आहे. तेव्हा त्या ठिकाणी महिला पोसई शिंदे, पोहेकॉ. घाटगे, मोरे असे पोहोचले असता हणमंत बाबुराव डोंबाळे (वय ६५ वर्षे रा. शेळगांव, ता. इंदापूर ) हा इसम बसलेला आढळला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्याच्याकडे अंदाजे वर्षाचे लहान बाळ असल्याचे दिसले. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माझे व पत्नीचे भांडण झाले आहे. म्हणून मी बाळाला घेऊन बाहेर पडलो आहे, असे सांगितले. त्याच्याकडे त्याच्या सासुरवाडीची चौकशी केली असता त्याने बारगांवमळा, एकशीव येथील त्याच्या मेव्हण्याचे नाव सांगितले. या गावातील पोलीस पाटील, सरपंच व त्याच्या मेव्हण्याकडे चौकशी केली असता, सदर इसम गेल्या १६ वर्षांपासून घरी आलेला नाही. तो त्याच्या पत्नीला सांभाळत नाही व त्याचा मुलगा १८ वर्षांचा असून मुलीचे लग्न झाल्याचे सांगितले.

मग त्याच्याकडे एवढे लहान बाळ आले कोठून, असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच सदर इसमाने हे बाळ मडगांव (गोवा) येथून उचलले असल्याचे सांगितले. हणमंत डोंबाळे यास आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अकलूज पोलीस गोवा पोलीसांशी संपर्क साधत आहेत. सदर बाळाला पंढरपूर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ. राजु नायकवडी करत आहेत.17 तारखे पर्यंत आरोपीस पोलिस रिमांड मिळाली असून पोलिस तपास पथक गोवा येथे जाणार असल्याचे सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #गोवा #अकलूज #पोलिस #वर्षाचेबाळ #बाळाचातपास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 जणांच्या नातेवाईकांना मिळणार एसटी महामंडळात नोकरी
Next Article व्याजाचा तगादा लावत अपहरण; एका सावकारास अटक, बापलेक फरार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?