Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून घरात घुसून चोरी; सातजणांविरुद्ध गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून घरात घुसून चोरी; सातजणांविरुद्ध गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/05/20 at 6:47 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ यात्रेची वर्गणी दिली नाही म्हणून घरात घुसून मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखलस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ माहेरच्या लोकांना का बोलावली म्हणून विवाहितेस मारहाण; पती आणि सासू विरुद्ध गुन्हा■ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाखाला गंडा

सोलापूर – आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी मोनू सोरटे याला पोलीस ठाण्यात का नेले होते? या कारणावरून घरात घुसून कपाटातील रोख रकमेसह ६७ हजाराचे दागिने पळवून नेले. ही घटना टाकळी (ता.माढा) येथे बुधवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास घडली. Burglary due to reporting to police; Crime against 7 persons

या प्रकरणात बाळू भिमराव नगरे (वय ४० रा.टाकळी) यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी सुधिर भारत कळसाईत, दादा कळसाईत, नवनाथ कळसाईत, आणि अन्य चौघे  अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोनू सोरटे याला तू गाडीवर बसवून माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी का आला होता, असे म्हणत सातजणांनी हा प्रकार केला, अशी नोंद पोलिसात झाली आहे.

□ यात्रेची वर्गणी दिली नाही म्हणून घरात घुसून मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर – यात्रेची वर्गणी दिली नाही शिवाय पालखी थांबून दर्शन का घेतले? या कारणावरून घरात बसून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना वरळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुक्याचा पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात सुनील नागनाथ देवकर (वय २९ रा.वरळेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी लक्ष्मण बनसोडे, श्रीमंत हक्के, मारुती देवकर, भारत बनसोडे आणि सुनील नवले (सर्व रा. वरळेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार सूळ पुढील तपास करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/544656223878778/

 

□ माहेरच्या लोकांना का बोलावली म्हणून विवाहितेस मारहाण; पती आणि सासू विरुद्ध गुन्हा

सोलापूर – माहेरच्या लोकांना का बोलावली या कारणावरून काठी आणि  लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत विवाहिता जखमी झाली. ही घटना उपळवाटे (ता.माढा) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

यासंदर्भात स्वाती ज्ञानेश्वर घोरपडे (वय २३ रा.उपळवाटे) हिने टेम्भूर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी स्वातीच्या पती ज्ञानेश्वर घोरपडे आणि सासू संगीता घोरपडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्वाती घोरपडे हिची आई, वडील आणि भाऊ असे घरी आले होते. रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून पहाटेच्या सुमारास पतीने काठीने तर सासुने तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.पतीने तिच्या मुलाचा हिसकावून घेऊन त्याला ठार मारण्याची धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली हवालदार बारकीले पुढील तपास करीत आहेत.

■ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाखाला गंडा

सोलापूर : इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते १४ एप्रिल २०२२ दरम्यान चाटी गल्ली सोलापूर येथे घडली.

याप्रकरणी विजयकुमार व्यंकटेश विटकर (वय-३८,रा.भवानी पेठ,मड्डी वस्ती,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून कृष्णा (पुर्ण नाव माहीत नाही), मनीष ठाकुर,ब्रिज मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी विटकर यांनी सन २०१४ मध्ये सोलापूर येथे आयसीआयसीआय बँकेमधून मॅक्स लाइफ इन्शुरन्सची पॉलिसी काढली होती.त्या पॉलिसीचा हप्ता वर्षाला २४ हजार रुपये भरत होते.त्यानंतर फिर्यादी विटकर यांनी सुमारे तीन वर्षे पॉलिसीचे हप्ते भरले. परंतु त्यानंतर पैसे भरणे बंद केले होते.दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते दि.१४ एप्रिल २०२२ रोजी दरम्यान वरील संशयित आरोपी यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक ८७४२९४५१४७, ७५३४९५६११६, ९९५३२८९३४१ या मोबाईल क्रमांकाच्या धारकाने एस बँकेत खाते क्रमांक ००१६८५८००००२१७४ या क्रमांकाचा धारक असे संगणमत करून फिर्यादी विजयकुमार विटकर यांना इन्शुरन्स पॉलिसीचे एक कोटी नऊ लाख रुपये मिळवून देतो असे सांगितले.

त्यानंतर ती रक्कम प्राप्त करून न देता व फिर्यादी कडून वरील संशयित आरोपींनी फिर्यादी विटकर यांची वेळोवेळी प्रोसेसिंग फी,कोड चार्जेस,ट्रान्सफर चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून विश्वासाने घेतलेली एकूण ८१ लाख ३९ हजार रुपये रक्कम परत न करता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करीत आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/544645640546503/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Burglary #reporting #police #Crime #against #solapur #persons, #सोलापूर #पोलिस #तक्रार #कारणावरून #घरात #घुसून #चोरी #सातजणांविरुद्ध #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्टेरिंग रॉड तुटल्याने एसटी बस पलटली, सोलापुरात मुसळधार पाऊस
Next Article आमदार स्थानिक विकास योजनेतून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?