Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भक्तीपूर्ण वातावरणात नूतन काशी जगद्गुरूंचा अड्डपालखी सोहळा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भक्तीपूर्ण वातावरणात नूतन काशी जगद्गुरूंचा अड्डपालखी सोहळा

Surajya Digital
Last updated: 2022/05/21 at 9:14 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
□ भर पावसातही हजारो भक्तगणांचा सहभागस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ भर पावसातही हजारो भक्तगणांचा सहभाग

सोलापूर : काशीपीठाचे जगद्गुरु व बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांची भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी काढण्यात आली. या सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील तसेच शहर जिल्ह्यातील हजारो भक्तगण सहभागी झाले होते. Addapalakhi ceremony of the new Kashi Jagadguru in a devotional atmosphere

वाराणसी येथील काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य यांची काशी पीठाचे ८७ वे जगदगुरु म्हणून १३ में रोजी काशी येथील जंगमवाडी मठात श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पट्टाभिषेक केला होता.

आपले मठाधीश जगदगुरु झाले याचा आनंद साजरा करावा आणि नुतन जगद्गुरु यांचे दर्शन व्हावे याउद्देशाने ही अड्डपालखी काढण्यात आल्याचे होटगी मठाचे संचालक शिवानंद पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी ५ वाजता नुतन जगदगुरु डॉ. मल्लिकार्जून विश्वाराध्य जगदगुरू यांची अड्डपालकी बाळीवेस येथील मल्लिकार्जून मंदिर येथून निघाली. त्यानंतर चाटी गल्ली, मंगळवारपेठ, मधला मारुती, माणिकचौक, पंचकट्टा यामार्गे ती ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर येथे समाप्त करण्यात आली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/544732437204490/

 

यावेळी उपस्थित भक्तांनी दिलेल्या जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय …… जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला. मिरवणूकीच्या प्रारंभी जलकुंभ घेतलेल्या १०१ सुवासिनी होत्या. त्यामागे बँड पथक होते.

खास आंध्र प्रदेश वरून पुरवंत आपली कलाप्रकारांचे सादरीकरण करत होते. त्याचा मार्गावरील भक्तगण दर्शन घेऊन धन्य होत होते. पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना देखील मिरवणुकीतील भक्त आणि मार्गावरील भक्त यांच्या संख्या कमी झाली नाही.

यांची यावेळी मंद्रपचे रेणूक शिवाचार्य, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य, श्रीकंठ शिवाचार्य, होटगी मठाचे उत्तराधिकारी चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, तम्मा मसरे, राजशेखर हिरेहब्बू, केदारनाथ उंबर्जे, अमर पाटील, सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, बसवराज शास्त्री – हिरेमठ, शिवयोगी शास्त्री होळीमठ, प्रभुराज विभुते, दिलीप दुलंगे, राजेंद्र गंगदे – आदी उपस्थित होते.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Addapalakhi #ceremony #new #Kashi #Jagadguru #devotional #atmosphere, #भक्तीपूर्ण #वातावरण #नूतन #काशी #जगद्गुरू #अड्डपालखी #सोहळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article tragic truck accident पेट्रोल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू
Next Article Bjp Sanwad Yatra षडयंत्र रचून उजनीचे पाच टीएमसी पाणी पळवले; सरकारला शेतक-यांपेक्षा बारमालकांची काळजी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?