□ यावर फडणवीस यांनी पंढरपुरात दिली प्रतिक्रिया
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्राह्मण संस्थांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी त्यांनी विविध संस्थांना भेटायला बोलावले आहे. पण या बैठकीस जाण्यास ब्राह्मण महासंघाने नकार दिला आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा पवारांनी अशा प्रकारची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक आहे. ब्राह्मण समाजातील काही घटक त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे. Sharad Pawar to discuss with Brahmin organizations today; But the Brahmin Federation turned down the invitation to Pune
शनिवारी ही बैठक पुण्यात पार पडणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीने दिली आहे. पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मते सोशल मीडियावर व्यक्त केली जातात. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका आणि ब्राह्मण संघटनांचे म्हणणे यावर सखोल चर्चा होईल.
राष्ट्रवादीचे नेते वारंवार ब्राह्मणविरोधी वक्तव्ये करतात. इस्लामपूरच्या सभेत अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची चेष्टा केली. तर कोल्हापूरच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाला टार्गेट करताना पूजाविधी करणे हा ब्राह्मण समाजाचा धंदा आहे, असे वक्तव्य केले.
शरद पवारांनी देखील एका सभेत शाहू महाराज – ज्योतिषाचे उदाहरण दिले. एकंदरीतच अशा वक्तव्यातून राष्ट्रवादीचे ब्राह्मण समजाबाबतचे मत दिसून येते. पवारांनी ब्राह्मण समाजाबाबत प्रथम त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नंतरच आम्ही चर्चेला जाऊ असे म्हणत ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी शरद पवार यांनी दिलेल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545067217171012/
शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी या बैठकीला जाणार नसल्याचे सांगत चर्चेवर बहिष्कार घातला आहे. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात प्रतिक्रिया दिली आहे. ”पवार साहेबांना ब्राह्मण समाजाची आठवण झाली बरं झालं. आनंद आहे इतक्या वर्षांनी पवार साहेबांना ब्राम्हणांची आठवण आली आहे. सर्वांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे व कोणत्याही समाजाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे.” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544732437204490/