Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळमध्ये शेतातून ५० डझन हापूस आंब्याची चोरी; सोलापुरात तरुणीची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मोहोळमध्ये शेतातून ५० डझन हापूस आंब्याची चोरी; सोलापुरात तरुणीची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/05/22 at 10:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर –  शेतातील आंब्याच्या बागेतून चोरट्यांनी ५० डझन हापूस आंबे चोरून नेल्याची घटना पांडवाची पोफळी (ता. मोहोळ) येथे काल शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. Theft of 50 dozen hapus mangoes from a field in Mohol; Suicide of a young woman in Solapur

Contents
□ साईनाथ नगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्यास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ नवरदेवाच्या कट्यारीने मारहाण तरुण जखमी□ कामती येथे शेतमजूरास मारहाण, दोघे जखमी□ गार्डी येथे आत्महत्येचा प्रयत्न

यासंदर्भात विठ्ठल धर्मा वाघमारे (वय ७० रा. पांडवाची पोफळी) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली. चोरट्यांनी काल पहाटेच्या सुमारास आपल्या शेतातील बागेतून ५० डझन हापूस आंबे (कच्चे) चोरून नेले. त्याची किंमत १० हजार रुपये इतकी असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक फौजदार चवरे पुढील तपास करीत आहेत .

□ साईनाथ नगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – अमन चौक परिसरातील साईनाथ नगर भाग २ येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

पूजा रामचंद्र गायकवाड (वय २६ रा.१४५ साईनाथ नगर २) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. काल
शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिने घरातील छताच्या लोखंडी पाइपला ओढणीने गळफास घेतली होती.

तिला फासातून सोडवून भाऊ (शुभम) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली. मयत पूजा गायकवाड यांच्या पश्चात आई वडील आणि २ भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार मणुरे पुढील तपास करीत आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ नवरदेवाच्या कट्यारीने मारहाण तरुण जखमी

सोलापूर – लग्न मंडपात नवरदेवाची कट्यार घेतल्याच्या कारणावरून लाथाबुक्या आणि कट्यारीने झालेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला. ही घटना सलगरवस्ती परिसरातील परिसरातील सुवर्णा मंगल कार्यालयात आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

प्रीतम चंद्रकांत गायकवाड (वय २१ रा. शहानगर, लिमयेवाडी) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने नवरदेवाची कट्यार घेतली होती. तेंव्हा नवरदेवाकडील रमेश गायकवाड यांच्यासह १० जणांनी त्याला हाताने मारहाण करून त्याच कट्यारीने डोक्यात वार केला, अशी नोंद सलगर वस्ती पोलिस आज झाली आहे .

□ कामती येथे शेतमजूरास मारहाण, दोघे जखमी

सोलापूर  : कामती येथील दत्तात्रय वानकर यांच्या शेतात लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत दत्तात्रय शंकर होनेनवरू (वय ३४) आणि सादीक इसाक मुल्ला (वय २३ दोघे रा.देगाव,वानकर वस्ती) हे दोघे मजूर जखमी झाले. ही घटना काल शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. भीमा क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघांनी विनाकारण मारहाण केली, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ गार्डी येथे आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर : गार्डी (ता.पंढरपूर) येथे राहणाऱ्या सत्यवान जंगलु शिंदे (वय ३२) याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. ही घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली असून या मागचे कारण समजले नाही.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Theft #dozen #hapusmangoes #Mohol #Suicide #young #woman #Solapur, #मोहोळ #शेत #डझन #हापूस #आंबा #चोरी #सोलापूर #तरुणी #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Two accidents in Solapur सोलापुरात दोन अपघात; डॉक्टर दाम्पत्यासह आठ ठार
Next Article Uhani water उजनीसाठी पुणे, नगरच्याही जमिनी बाधित; उजनीचे पाणी पळवणारच

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?