□ वस्तुस्थिती समजून घ्यावी म्हणत अजितदादांनी सोलापूरकरांनाच समजावले
बारामती : उजनीच्या पाण्याचे वाटप पूर्वीच झालेले आहे. मंजूर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांबरोबर त्याचवेळीच इंदापूर तालुक्यातील काही गावांना पाणी मंजूर झालेले आहे. अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने इंदापूरची योजना मागे पडत होती. मात्र, आता त्याला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. ही वस्तुस्थिती सोलापूरकरांनी समजून घ्यावी, सर्वांनी पाणी वाटपाबाबत सामंजस्याची भूमिकाही घेतली पाहिजे. धरणे होत असताना पुणे, सोलापूर, नगर आदी जिल्ह्यातील लोकांच्या जमिनी बाधीत झाल्या बाधीत आहेत, याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. Lands of Pune, Nagar also affected for Ujani; Ajit Pawar Guardian Minister Dattatraya to fill the water of Ujjain
ते रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींची संवाद साधताना या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना उजनीच्या पाण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, यापुढील काळात निरा खोऱ्यातील पाणी आपण भीमा खोऱ्यात घेऊन जात आहोत. त्या प्रकल्पातून मराठवाड्यालाही पाणी देणार आहोत. शेवटी सर्वांनी पाणी वाटपाबाबत सामंजस्याची भूमिका ही घेतली पाहिजे. धरणे होत असताना पुणे, सोलापूर, नगर आदी जिल्ह्यातील लोकांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/546370867040647/
□ उजनीचे पाणी पळवणारच
अजित पवार यांच्या या वक्तव्याने उजनीचे पाणी पळवले जाणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. या पाण्यावरून गेल्या आठवडाभरापासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. भाजपच्या आमदारांनी विरोध केला आहे तरीही अजितदादांनी लाकडी निंबोडी योजनेस पाणी दिले जाणार हे सांगितले आहे, त्यामुळे आता उजनीचे पाणी पाळवले जाणार हे जवळपास स्पष्टच झाले आहे.
● पालकमंत्री बदलण्याची शक्यता नाही
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलले जाणार असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांची याबाबत भेट घेतलेली होती. तेव्हापासून या चर्चेला उधाण आले असले तरी पालकमंत्री बदलण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात, तशी कुणी मागणी केली असेल तर मला माहिती घ्यावी लागेल पण हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री यांचाच असतो, असे सांगून तशी शक्यता नसल्याचे अजितदादा यांनी स्पष्ट केले आहे.
》 हा मामा थांबणार नाही, दत्तात्रय भरणेंनी दिला इशारा…
□ हर्षवर्धन पाटलांवर साधला निशाणा
पुणे : उजनी धरणातून येणारे पुण्याचे सांडपाणी इंदापूर तालुक्यातील शेतीला उपलब्ध करुन देण्याच्या योजनेला खीळ घालण्यासाठी सोलापूरकरांमध्ये उद्रेक घडवून आणण्याचा प्रयत्न तालुक्याचे १९ वर्षे प्रतिनिधित्व केलेले आणि प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसण्याची संधी मिळालेल्या नेत्याने केले. सध्या त्यांना काही काम शिल्लक राहिले नसल्याने तालुक्यात जातीयवादाचे विष पेरण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे, असा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांवर केला.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील सुमारे ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते.
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या लग्नात थेट उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कानाला लागून तालुक्यात जातीयवाद चालल्याचे सांगणारे जनतेमध्येही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही भरणे म्हणाले. खडकवासला कालव्यात उजनीचे पाणी सोडण्याची योजना हाणून पाडण्याचे कामही विरोधकांनीच केले आहे.
स्वतःचे राजकारण संपुष्टात आल्याने विरोधकांनी सोलापूरकरांमध्ये गैरसमज निर्माण करून मला तेथे झिरो करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र, हा मामा अजून थांबलेला नाही. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जे काही करता येईल, ते ते करण्याची माझी तयारी आहे, असा निर्धार भरणे मामांनी बोलून दाखवला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/546124343731966/