दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे राहणारे नरहरी दिलीप खांडेकर या इसमाने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. Youth commits suicide by hanging in South Solapur
पुढील हकीकत अशी की, ज्योतिबा बाबासाहेब गावडे वय (वय ३२, रा. गावडेवाडी तालुका दक्षिण सोलापूर) यांनी मंद्रूप पोलिसांत फिर्यादी दिली. यानुसार रविवारी (दि. २२) फिर्यादी व फिर्यादीच्या घरचे सर्वजण घरात जेवण करीत होते. फिर्यादीचा मेहुणा नरहरी दिलीप खांडेकर वय वर्षे (रा. ३५, राहणार गावडेवाडी , दक्षिण सोलापूर ) हा फिर्यादीच्या घरी आला होता.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून तो त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर फिर्यादी २३ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उठून शेतातील मोटार चालू करण्याकरिता जात असताना फिर्यादीचा मेहुणा नरहरी दिलीप खांडेकर हा अज्ञात कारणावरुन झाडास स्कार्पने लटकत असलेला दिसला
त्यानंतर उपस्थित सर्वांनी मिळून स्कार्प सोडून त्यास खाली उतरवले असता तो जागीच मयत झाल्याचे निदर्शनास आले. मयताची खात्री झाली. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद मंद्रूप पोलिसात झाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/546590427018691/
□ साईनाथ नगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – अमन चौक परिसरातील साईनाथ नगर भाग२ येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 21) रात्रीच्या सुमारास घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पूजा रामचंद्र गायकवाड (वय २६ रा.१४५ साईनाथ नगर २)असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिने घरातील छताच्या लोखंडी पाइपला ओढणीने गळफास घेतली होती. तिला फासातून सोडवून भाऊ (शुभम) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली. मयत पूजा गायकवाड यांच्या पश्चात आई वडील आणि २ भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार मणुरे पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/546370867040647/