औरंगाबाद : जल आक्रोश मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी रस्ता मोकळा करून दिला. रावसाहेब दानवे जीपमधून खाली उतरले, हातात भाजपचा झेंडा घेतला आणि त्या झेंड्यानेच त्यांनी फडणवीस उभे असलेल्या जीप समोरील गर्दीला मागे लोटले. त्यांचे हे रांगडे रुप पाहून उपस्थितांना त्यांचे भलतेच कौतुक वाटले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Union Minister Danve Fadnavis makes his way through the crowd to Aurangabad with a flagpole
देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळी रोड शो काढण्यात आला, तेव्हा रस्त्यावर झालेली गर्दी कमी करण्यासाठी रावसाहेब दानवे रस्त्यावर उतरले. मोर्चात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. फडणवीसांनी औरंगाबादमधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं.
या मोर्चात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील सहभागी झाले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची गाडी मोर्चातून जात होती. पण कारच्या समोरच कार्यकर्ते गर्दी करु लागल्यानं मोर्चा पुढे सरकत नव्हता. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.
पोलीसही कार्यकर्त्यांना पुढे सरकण्याचं आवाहन करत होते. तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मग रावसाहेब दानवेच कारमधून खाली उतरले, हातात एक भाजपाचा झेंडा घेतला आणि झेंड्याच्या काठीनं गर्दीला कारच्या समोरुन दूर लोटू लागले. दानवेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर काहीजण टीका करीत आहेत. एक केंद्रीय मंत्री असून असा प्रकार पाहून अनेकजण लाचारी म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय वेळ आणली असाही सवाल विचारला जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547230863621314/
शहरातील माझ्या भगिनी आणि बंधूंनी या मोर्चाला दणदणीत प्रतिसाद देत महाविकास आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला. हा पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोवर भाजपा पूर्ण ताकदीने हा संघर्ष करेल. मोर्चातील प्रत्येक भगिनीचा आक्रोश प्रशासनाची दैना सांगणारा होता असा टोला देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक पालिकेला लगावल आहे.
□ रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला घेतला चिमटा
राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने आपली राज्यसभेची जागा संभाजीराजे यांना देऊ केली असती तर, या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती पक्षाचा आदर दिसून आला असता, असा चिमटा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काढलाय.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपा दोन जागांवर निवडून येण्याची शक्यता असून, या पक्षाकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा जिंकू शकते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे.
शिवसेनेने त्यांची निश्चितपणे निवडून येणारी पहिली जागा संभाजीराजेंना देऊ केली असती तर, त्यांच्याप्रती आदर दिसून आला असता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले संभाजीराजे यापूर्वी राष्ट्रपती निर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर गेले होते. यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली असून, त्यांनी सर्व पक्षांचा पाठिंबा मागितला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547119760299091/