अकलूज : तीस लाख रुपयाचे कस्टमचे सोने अवघ्या वीस लाख रुपयात देतो म्हणून अकलूजमध्ये एकाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आलंय. यासंदर्भात अकलूज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. 30 lakh gold in Akluj for Rs 20 lakh fraud as Pandharpur Mangalsutra bus stand
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी विजय शिवाजी भोंडवे व जयदीप विजय भोंडवे (रा. निढळ ता. खटाव जि. सातारा) यांनी अकलूज येथील बाबासाहेब मारुती भोळे (रा. राऊतनगर, अकलूज) यांच्याकडून तीस लाख रुपये किंमतीचे कस्टमचे सोने अवघ्या वीस लाख रुपयात देतो, असे म्हटले.
यासाठी रोख सोळा लाख व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव तालुका खटाव खाते क्रमांक ६८०२३२२८१८५ या खात्यावर वेळोवेळी चार लाख रुपये असे वीस लाख रुपये भरण्यात आले. मात्र पैसे भरूनही सोने मिळत नसल्याने फिर्यादी बैचेन झाली. वारंवार विचारणा करूनही उचित उत्तर मिळत नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली.
सोने मिळत नसल्याने फिर्यादी भोळे यांनी पैशाची मागणी केली असता आरोपींनी अकलूज येथे येवून शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली असल्याची फिर्यादीत म्हटले आहे. अकलूज पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
यासंदर्भात सदर आरोपीवर भादवि कलम ४२०,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी विजय भोंडवे यांना ताब्यात घेतले असून २७ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा आधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मारकड हे करीत आहेत.
□ पंढरपूर बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी
पंढरपूर : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याची घटना पंढरपूर येथे समोर आली असून सदर प्रकार पंढरपूर बस स्थानक घडलेला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकी वरून पळून जाण्याचे प्रकार पंढरपुरात नेहमीच घडत असतात.
बस स्थानकावर बसमध्ये चढताना घाईत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील पैशाचे पाकीट, मोबाईल, आणि महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याचे प्रकार ही पंढरपुरात नवीन नाहीत. बसमध्ये जागा मिळवण्याच्या हेतूने बसमध्ये चढण्यासाठी प्रवासी चढत असताना त्यावेळी प्रवासात मोठ्या प्रमाणात ढकला ढकली आणि रेटारेटी होत असते. कोण कोणाला ढकलतो आणि कुणाचा कुणाला धक्का लागतो हे कुणी पाहात देखील नाही. याचाच फायदा चोरटे उठवीत असतात. प्रवासी असल्याचे नाटक करीत प्रवाशांच्या गर्दीत चोर घुसून चोरी करतात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547981856879548/
या गर्दीत सफाईदारपणे चोरी करून हळूच मागे पसार होतात. आपली चोरी झाली हे लक्षात येईपर्यंत बराच अवधी निघून गेलेला असतो. तोपर्यंत चोरटा तेथून प्रसार झालेला असतो. कोरोनाच्या काळात आणि नंतर एसटी कर्मचारी संपामुळे लालपरी बंद होती. त्यामुळे बस स्थानकात शुकशुकाट होता. काही दिवसांपूर्वीच लालपरी रस्त्यावर धावायला लागली. आता प्रवाशांच्या संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढायला लागली.
यातच चोरांचा वावर देखील पंढरपूर बस स्थानकाच्या आवारात सुरू झाल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पंढरपूर बस स्थानकावर एक महिला एसटीमध्ये चढत असताना तिच्या गळ्यातील 50 हजार रुपयाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी पळवलेची घटना घडली आहे. इंदापूर येथील शुभांगी यादव व त्यांचे पती आणि मुलासोबत मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथे गेल्या होत्या. नातेवाईकांना भेटून त्या परत आपल्या गावी निघाल्या असताना पंढरपूर बस स्थानकावर ही घटना घडली आहे.
यादव कुटुंब आपल्या गावी परतण्यासाठी पंढरपूर बस स्थानकावर आले असताना काही वेळ बस येण्याची त्यांनी वाट पाहिली. नंतर पंढरपूर अकलूज बस येऊन उभी राहिले असता अकलूजकडे जाणाऱ्या बसमध्ये गर्दी कमी प्रमाणात असल्याने अनेक प्रवासी बसची प्रतीक्षा करीत बसले होते. त्यातच पंढरपूर बस स्थानकावर बस लागताच प्रवासी गर्दी करून बस मध्ये चढण्यासाठी दरवाजापाशी एकच झुंबड उडाली.
प्रवाशांची गर्दी झालेली असताना यादव कुटुंब देखील या बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी शुभांगी यादव यांच्या हातावर मंगळसूत्राचे काही मणी खाली जमिनीवर पडले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडल्याचे त्वरित लक्षात आले. परंतु तोपर्यंत पंढरपूर बस स्थानकातील चोरटा पसार झाला होता.
या घटनेबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मुलाणी हे करीत आहेत. पूर्वीप्रमाणे बसस्थानकावर असणारा पोलिस बंदोबस्त आता दिसेनासा झाला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547977170213350/