■ चित्रकार सचिन खरात यांनी साकारली अनाेेखी चित्रे
सोलापूर : पाेलिसांच्या खाकी वर्दीबद्दल प्रत्येकालाच आकर्षक आणि आदर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतगायत पाेलिसांच्या गणवेशात अनेक बदल झाले. हे बदल कसे झाले याचे दर्शन साेलापूरच्या पाेलिस आयुक्तालयात हाेत आहे. The history of change of khaki uniform can be seen in the Palis Commissionerate of Solapur
साेलापूरचे चित्रकार सचिन खरात यांनी पाेलिस आयुक्त हरिश बैजल यांच्या सुचनेनुसार देशातील पाेलिसांच्या गणवेशात झालेल्या बदलाची चित्रे साकारली आहेत. ही चित्रे रविवारी त्यांनी पाेलिसांना सुपूर्द केली. पाेलिस आयुक्त हरिश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस आयुक्तालयात अनेक नाविण्यपूर्ण बदल घडत आहेत. पाेलिस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये पाेलिस दलात स्वातंत्र्यपूर्व काळापासून झालेले बदल मांडणारी चित्रे लावण्यात येत आहेत.
या चित्रांबद्दल सचिन खरात म्हणाले, पाेलिस दलाबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. समााजात कायदा व सुव्यवस्था नांदावी यासाठी पाेलिस दादा अहाराेत्र रात्र कार्यरत असतात. पाेलिस दलात पंजाब, मध्यप्रदेश, चेन्नई (मद्रास), मुंबई (बाॅम्बे), काेलकाता, म्हैसूर, मणिपूर, पाॅंडेचरी या विभागातील पाेलिसांच्या गणवेशात 1843 ते 1861, 1861 ते 1902, 1873 ते 1885 या कालावधीत कसे बदल झाले याची एकूण आठ चित्रे साकारली आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/548047913539609/
प्रत्येक पाेलिस दलातील पाेलिसांच्या टाेप्या, बेल्ट, बूट, बक्कल, शर्टचे प्रकार, पॅंटचे प्रकार, काठी, बंदूक यांचे प्रकार वेगवेगळे हाेते. पंजाब आणि मुंबईच्या पाेलिसांवर ब्रिटीशांच्या पेहरावाचा प्रभाव हाेता असे जाणवते. मुंबई पाेलिसांचा गणवेश पूर्वी निळ्या रंगाचा हाेता. हाफ चड्डी, ढगळी पॅंट असाही बदल झाला. म्हैसूर, मध्यप्रदेश प्रांतांतील राजेशाहीच्या दरबारातही पाेलिस हाेते. या पाेलिसांच्या पेहरावात दरबारी पेहरावाची झलक दिसते. वाहतूक पाेलिसांच्या गणवेशातही अनेक बदल झाले. या सर्व गाेष्टी जशाच्या तशा साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे.
या चित्रांचा शुभारंभ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते काल मंगळवारी (ता.24 ) झाले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, छाया बैजल, सहायक आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, दीपक आर्वे यांच्यासह पोलिस निरीक्षक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कलाकृतीचे कौतुक केले. पोलिस अधीक्षक कार्यालयातही अशी कलाकृती तयार करून घेते घेता येईल का? याबाबत नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खरात यांच्या मदतीने मीही छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.
■ पाेलिसांची दूर्गा प्रेरणा देईल…
देशाच्या पाेलिस दलात महिला पाेलिसांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. एक संवेदशनील आई ते कडक शिस्तीची अधिकारी अशा वेगवेगळ्या टप्प्यावर महिला पाेलिसांना काम करावे लागते. ड्यूटीवर त्या दूर्गाच असतात. ही भावना समाेर ठेउन दूर्गा रुपातील महिला पाेलिसाचे एक चित्र साकारले आहे. हे चित्रही नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547981856879548/