मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात गोवण्यात आलं. आज त्याला क्लिन चीट दिली आहे, यामागे भाजपचा हेतू चांगला नव्हता असं पटोले म्हणाले आहेत. Aryan Khan was involved; Congress makes serious allegations against BJP Nana Patole UP election
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने क्लीनचीट दिली आहे. त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे एनसीबीने सांगितले आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात एनसीबीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये आर्यन खानसह 6 जणांची नावे वगळण्यात आली आहेत. या प्रकरणी आर्यन खान 1 महिने तुरूंगात होता.
भाजपाने उत्तर प्रदेशाच्या निवडणुका कसेही करून निवडून येण्यासाठी आर्यन खान प्रकरण समोर आणलं, असा गंभीर आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देशातील तरुण-तरुणींच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचे काम नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने केले आहे. असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. पालघर दौऱ्यावर आले असताना काँग्रेस भवनच्या एका सभागृहात घेलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकार वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला नाहक त्रास देण्याचे कटकारस्थान व अभद्र चाळे करत आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांमध्ये भाजपाला कसेही करून निवडून यायचे होते. यासाठी महाराष्ट्रामध्ये आर्यन खान अमली पदार्थ प्रकरण समोर आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मतांसाठी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याचे म्हटले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/549684960042571/
आता आर्यन खानला अमली पदार्थ प्रकरणांमध्ये पकडणाऱ्या त्याच केंद्राच्या तपास यंत्रणेने त्याच्याकडे असे कुठलीही अमलीपदार्थ नव्हते, असे सांगून त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे भाजपाचा तो डाव उघडा पडला आहे. भाजपा या कटकारस्थानामुळे तोंडावर पडल्याचे म्हटले.
□ तरुणांचा उडता पंजाब करून तरुणाईला संपवण्याचे पाप
गुजरातच्या अदानी बंदरावर सापडलेल्या कोट्यावधी रुपयांच्या अमली पदार्थाविषयी नाना पटोले म्हणाले, “अदानी बंदरावर विदेशातून अमली पदार्थ आणले जाते व अनेकदा ते पकडले गेले आहे. हा कट उधळणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई केली गेली. याचा अर्थ या प्रकरणांमध्ये केंद्रातल्या भाजपा सरकारचा सहभाग आहे. भारतात असे अमली पदार्थ आणून देशातल्या तरुणांचा उडता पंजाब करून तरुणाईला संपवण्याचे पाप भाजप करत असल्याचे सिद्ध होत आहे.”
》 महत्वाच्या घडामोडी
– 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टीकालीन न्यायालयाकडून 4 ऑक्टोबरपर्यंत पहिली कोठडी [ ड्रग्स केस]
– 7 ऑक्टोबरला मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून आर्यनला न्यायालयीन कोठडी.
– 30 ऑक्टोबर : अखेर आर्यन खानची जामीनावर सुटका
– 27 मे : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/549375676740166/