नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. महंत नृत्य गोपालदास यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. ते काल बुधवारी झालेल्या कृष्ण जन्माष्ठमी सोहळ्यातही सहभागी झाले होते. तसेच ते राम जन्मभूमीपूजन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासोबत कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते, त्यामुळे चिंता वाढली असून पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ आता क्वारंटाईन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. नृत्य गोपाळ दास यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांना ऑक्सीजन लावण्यात आला आहे. नृत्य गोपाळ दास सध्या मथुरामध्ये आहेत. आग्राचे सीएमओ आणि अनेक डॉक्टर नृत्य गोपाळ दास यांच्या उपचारासाठी पोहचले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्य गोपाळ दास, त्यांचे समर्थक आणि मथुराचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. यासोबतच सीएम योगी यांनी मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशी चर्चा केली आणि महंत नृत्य गोपाळ दास यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी अयोध्यामध्ये रामललाचे दोन पुजारी कोरोना संक्रमित आढळले होते. याशिवाय अनेक पोलीस कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोना संकट पहाता राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते.
आता रामजन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास कोरोना पॉजिटिव्ह आल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वच लोकांची चिंता वाढी आहे. 5 ऑगस्टला अयोध्यामध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाच्यावेळी नरेंद्र मोदी मोहन भागवत यांच्यासह अनेक मान्यवर लोक व्यासपीठावर उपस्थित होते.