मुंबई : महाराष्ट्रात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचे हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. येत्या 7 ते 10 जून रोजी मान्सूनचे आगमन होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. तरी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुर्व मान्सूनच्या सरी बरसत आहेत. हवामान अनुकूल होत असल्याने पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होऊ शकते, अशा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. Monsoon date changed; Weather forecast for Maharashtra will be on this day
भारतीय हवामान विभागाने या वर्षी 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भाकित वर्तवले होते. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता मान्सून हा जवळपास चार दिवस उशिरा केरळमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान स्थितीचा अंदाज घेत कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये असे आवाहन केले आहे.
हवामान तज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने, पुढील २-३ दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान यंदा मान्सून लवकर बरसेल अशी शक्याता सांगितली जात होती. मात्र मान्सूनच्या अंदाजाची तारीख चुकलेली आहे. २७ तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
🌧☔पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने,
पुढील २-३ दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
– IMD
👍आज ही पावसाची सिमा अजून उत्तरेकडे सरकली. pic.twitter.com/ifSo1MTCTk— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 27, 2022
भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सून दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात नुकताच दाखल झाला आहे. खरं पाहता मान्सून हा दरवर्षी एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. गतवर्षी मान्सून दोन दिवस उशिरा म्हणजेचं तीन जूनला केरळमध्ये दाखल झाला होता.
यंदा मात्र आसनी चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाल्याने मान्सून केरळमध्ये 27 मेला दाखल होणार असल्याचे सांगितले जात होते.
सध्या मुंबईसह राज्यातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरणाची नोंद केली गेली आहे. असा ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण आता मान्सूनची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ५ जूनला मान्सून बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केरळमध्ये अजूनही मान्सूनचे कोणतेही अपटेड समोर आले नसल्याने महाराष्ट्रातला मान्सूनचा अंदाज चुकू शकतो.
दरम्यान, पुढील २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारत, तमिलनाडु, केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता सांगितली जात आहे.
● 60 ऐवजी 40 दिवस पाऊस
आता पुन्हा मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने मान्सून हा चार दिवस उशिरा केरळमध्ये दाखल होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून पोचायला उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान तज्ञांच्या मते, पूर्वी मान्सूनचा पाऊस हा 60 दिवस कोसळत असे मात्र आता यामध्ये मोठी घट झाली असून 40 दिवस पावसाचे राहणार आहेत. मात्र पावसाळा हा चांगला राहणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/549989946678739/