सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काल बुधवारी 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 374 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. 142 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. शहर व जिल्ह्यात एकूण 12 हजार 81 जण कोरोनाबाधित रुग्ण, तर 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांपैकी कोरोनावर मात करणा-यांची संख्या जादा ही दिलासादायक चित्र आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 92 हजार 528 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 हजार 81 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आतापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात मिळून आजपर्यंत एकूण 573 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 3 हजार 586 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 हजार 922 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहर व जिल्ह्यात एकूण 9 हजार 892 व्यक्ती होम क्वारंटाईन, तर 2 हजार 613 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत.
बुधवारी मृत्यू पावलेल्यांमध्ये बार्शी नाईकवाडी प्लॉट येथील 63 वर्षांचा पुरुष, सुभाषनगर बार्शी येथील 55 वर्षांचा पुरुष, बार्शी तालुक्यातील वैराग येथे 78 वर्षीय पुरुष, गाडेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, साकत येथील 61 वर्षीय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील 62 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील 65 वर्षीय महिला, माळीनगर येथील 58 वर्षीय पुरुष, चिकमहुद येथील 45 वर्षीय पुरुष, तर अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सोलापूर शहरातील पूनमनगर मजरेवाडी परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
* सर्वाधिक रुग्ण बार्शी, पंढरपुरात
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अक्कलकोट तालुक्यात 575, बार्शी 1 हजार 308, करमाळा 287, माढा 458, माळशिरस 513, मंगळवेढा 217, मोहोळ 388, उत्तर सोलापूर 431, पंढरपूर 1 हजार 350, सांगोला 258, दक्षिण सोलापूर तालुक्यात 746 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.