मुंबई/कोल्हापूर : कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचं नाव भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलं आहे. धनंजय महाडिक यांना सोमवारी मुंबईमध्ये या असा संदेश भाजपने दिला आहे. त्यामुळे उद्या पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्यासोबत आता धनंजय महाडिक आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. BJP announces third candidate for Rajya Sabha; Kolhapur Dhananjay Mahadik likely to hold elections
संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी पाठिंबा मागितल्याने चर्चेत आलेली राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार झाली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्य सभा द्विवार्षिक निवडणूक २०२२ साठी महाराष्ट्रातून उमेदवार म्हणून श्री. धनंजय महाडिक यांची निवड केली आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशी पोस्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
धनंजय महाजिक यांनी ट्विट करुन पक्षाचे आभार मानले आहेत. “भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने #RajyaSabhaElection2022 साठी महाराष्ट्रातून उमेदवार म्हणून माझी निवड केली याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात सर्वोत्तम योगदान देईन, हा विश्वास यानिमित्ताने देतो. धन्यवाद !”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551010043243396/
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनेही आपले जाहीर केले आहेत. तर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मात्र शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता भाजपने अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांच्यानंतर धनंजय महाडीक यांना आपला तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याच्या शक्यता बळावल्या आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सध्या राज्यात निवडणुक होतेय. त्यानुसार शिवसेनेने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक अशा जागांसाठी उमेदवार दिले आहेत. तर भाजपनेही दोन उमेदवारांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र त्यानंतर आता धनंजय महाडीक यांनाही पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबईत बोलावल्याची माहिती आहे.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण 7 उमेदवार रिंगणार उतरले आहे. ३ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्या दिवशी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष लढत होणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपने तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे.
शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता प्रत्यक्ष मतदान होऊन निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. राज्यसभेच्या ६ जागापैकी २ जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे. मात्र भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक यांना निवडून आणण्यासाठी भाजपला 18 अतिरिक्त मतांची मिळवणी करावी लागणार आहे.
त्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षांतील आमदारांची फोडा फोडी करण्यासाठी घोडाबाजार होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ आल्यास आवाजी पद्धतीने हात वर करून मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपला आमदाराचा घोडेबाजार करता येणार नाही. पण भाजपने तिसरा उमेदार रिंगणात उतरवला आहे मग निश्चितच त्यांच्या विजयाचेही गणित सोडवण्यासाठी रणनिती आखली असणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/550969963247404/