नवी दिल्ली : बियर बनवण्यासाठी पाणी जास्त वाया जातो. यामुळे सिंगापूरमध्ये चक्क शौच व मुत्रापासून बियर बनवण्यात येत आहे. ब्रुअरीने न्यूडू असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. ही बियर बनवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सिंगापूरमधील पाणी समस्यांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. दरम्यान, सिंगापूरमध्ये सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. Newbrew Beer Singapore uses defecation and urine to make beer
पाण्याच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी एका कंपनीनं चक्क सांडपाण्यापासून बियर बनवली आहे. ही बियर मलमुत्रापासून बनवण्यात येत आहे. सिंगापूरमधील एका ब्रुअरीने न्यूब्रू नावाची बिअर बाजारात आणली आहे. ही बियर मानवी मूत्र आणि विष्ठा असणाऱ्या सांडपाण्यापासून बनवली जात आहे.
8 एप्रिल रोजी राष्ट्रीय जल एजन्सी पीयुबी आणि स्थानिक क्राफ्ट बिअर ब्रुअरीजने सिंगापूर इंटरनॅशनल वॉटर वीक मध्ये वॉटर कॉन्फरन्सच्या संयोगाने न्यूब्रू नावाची बिअर लाँच केली. नवीन पाणी माल्ट, हॉप्स आणि यीस्ट स्ट्रेनचे स्वाद दूषित करत नाही. वॉटर कॉन्फरन्सचे व्यवस्थापकीय संचालक रायन युएन यांच्या मते, न्यूब्रू ही सिंगापूरची सर्वात हिरवीगार बिअर आहे ज्याचा उद्देश पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्याबाबत जागरूकता वाढवणे आहे.
Newbrew न्यूब्रू बियर सुमारे 95 टक्के गोड्या पाण्यापासून बनवली जाते, बिअर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पूर्णपणे फिल्टर केले जाते. मात्र इथे हे सांडपाणी किती प्रमाणात फिल्टर केले जाते हे तर देवच जाणे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551919216485812/
अलिकडच्या वर्षांत देशातील पाण्याच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे हा या कंपनीचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंगापूरला सध्या पाणीटंचाईच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि अशा परिस्थितीत देशात हा प्रकार घडत आहे.
न्यूब्रू बियर 95 टक्के सांडपाण्यापासून बनवण्यात आली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन करत सांडपाण्यावर प्रक्रिया करून सांडपाणी शुद्ध केलं जातं. त्यानंतर या पाण्याचा वापर न्यूब्रू बियर बनवण्यासाठी केला जातो. यामागचं मुख्य कारण म्हणजे सिंगापूरमधील पाणी समस्यांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे. सिंगापूरमध्ये सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.
द स्ट्रेट टाईम्सच्या मते, सिंगापूर इंटरनॅशनल वॉटर वीकमधील वॉटर कॉन्फरन्सच्या संयोगाने राष्ट्रीय जल संस्था पीयूबी आणि स्थानिक क्राफ्ट बिअर ब्रुअरी ‘Brewworks’ द्वारे 8 एप्रिल रोजी Newbrew लाँच करण्यात आलं. SIWW चे व्यवस्थापकीय संचालक रायन युएन यांच्या मते, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्यासाठीची जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने न्यूब्रू बियर बनवण्यात आली आहे. ही सिंगापूरची ‘ग्रीनेस्ट बिअर’ आहे.
सिंगापूरच्या पाणी टंचाईबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देशाच्या जलसंस्थेनं पाण्याच्या संकटाचा सामना करण्याचा मार्ग शोधला आहे. अशा प्रकारे सांडपाण्यापासून बिअर बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी या क्राफ्ट बिअर कंपनी ‘स्टोन ब्रूइंग’ ने 2017 मध्ये ‘स्टोन फुल सर्कल पेले एले’ लाँच केलं होतं. ‘क्रस्ट ग्रुप’ आणि ‘सुपर लोको ग्रुप’ सारख्या इतर ब्रुअरीजने देखील स्वच्छ सांडपाणी पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून क्राफ्ट बिअर बाजारात आणली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551747283169672/