Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महापालिका आयुक्ताचा केंद्राकडे बदलीसाठी अर्ज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महापालिका आयुक्ताचा केंद्राकडे बदलीसाठी अर्ज

Surajya Digital
Last updated: 2022/06/02 at 10:06 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ मंजुरीसाठी चार – पाच महिन्यांचा कालावधी लागणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील १२० नागरिकांना आर्थिक दंड□ परिचारिकांचा संप मागे

□ मंजुरीसाठी चार – पाच महिन्यांचा कालावधी लागणार

साेलापूर – महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आंध्रप्रदेशात या मूळ केडरमध्ये बदली मागितली आहे. ही प्रक्रिया पूर्ण हाेण्यास चार महिन्यांचा कालावधी लागेल असे पी. शिवशंकर यांनीच आज बुधवारी ( ता. 1) पत्रकारांना सांगितले. Application for transfer of Municipal Commissioner to the Center Solapur P Shivshankar Sanction period

पी. शिवशंकर हे आंध्रातील २०११ च्या बॅचचे आयएएस आहेत. आपला महाराष्ट्रातील दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपण केडर बदलास पात्र आहाेत. यासंदर्भातील अर्ज आपण केंद्र सरकारला सादर केला आहे. आंध्रातील टाेबॅकाे बाेर्डात बदलीसाठी अर्ज केला आहे. दाेन्ही राज्यांची मंजुरी आणि केंद्र सरकारची मंजुरी यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, असेही पी. शिवशंकर यांनी सांगितले.

काेराेनाच्या पहिल्या लाटेत पी. शिवशंकर यांची वखार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून साेलापूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली हाेती. आयुक्तपदाचा दाेन वर्षांचा कालवधीही पूर्ण झाला आहे. अधूनमधून त्यांच्या बदलीची चर्चा असते. यादरम्यान त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या शहरातील १२० नागरिकांना आर्थिक दंड

 

सोलापूर : महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलग न करता घंटागाडीत देणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई मंगळवारी सुरू केली. पहिल्याच दिवशी १२० नागरिकांना एकूण २६ हजार २०० रुपये दंड केला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठीच ही मोहीम हाती घेतली.

महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये कचरा देताना ओला व सुका कचरा विलग करून देण्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. कचऱ्याचे विलगीकरण न करता कचरा दिल्यास दंडात्मक कारवाई करू, असा इशाराही आयुक्तांनी दिला होता. पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी मंगळवारी वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या १२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

पालिकेने मंगळवारी प्लास्टिक विरोधी कारवाई केली. फळभाजी विक्रेते, बाजारपेठेमधील दुकाने, हॉटेल यांची तपाणी केली. यात ९३ किलो प्लास्टिक जप्त करून ७९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कचरा विलगीकरणासाठी लहान २७९ सोसायट्या, २३८ अपार्टमेंट, १२५ झोपडपट्टी, बाजारपेठांमध्ये प्रबोधन करण्यात आल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ बिराजदार यांनी सांगितले.

 

□ परिचारिकांचा संप मागे

#nurses #strike #maharashtra #परिचारिका #behind #सुराज्यडिजिटल #surajyadigital

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात गेल्या आठ दिवसांपासून असलेला राज्यभरातील हजारो परिचारिकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आली.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Application #transfer #Municipal #Commissioner #Center #Solapur #PShivshankar #Sanction #period, #महापालिका #आयुक्त #केंद्र #बदली #अर्ज #पीशिवशंकर #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुधीर हिरेमठ यांनी घेतला पदभार; पोलिसिंगमध्ये ‘क्राइम कंट्रोल’ महत्त्वाचे 
Next Article विजेचा शॉक बसल्याने सोलापुरातील मजुराचा मृत्यू

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?