Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यात खरिपाचा पेरा वाढणार; सोयाबीनचे माफक बियाणे उपलब्ध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापूर जिल्ह्यात खरिपाचा पेरा वाढणार; सोयाबीनचे माफक बियाणे उपलब्ध

Surajya Digital
Last updated: 2022/06/02 at 6:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● सोयाबीनचे माफक बियाणे उपलब्ध□  बार्शीतील तलाव दुरूस्तीसाठी दहा कोटी मंजूर 

सोलापूर : यंदा मान्सून लवकर अन् समाधानकारक हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सरासरी २ लाख ३४ हजार आहे. मात्र, यावर्षी तब्बल ३ लाख ४३ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होईल, असा अंदाज आहे. Kharif sowing will increase in Solapur district; Moderate soybean seeds available

सरासरीपेक्षा सव्वा लाख हेक्टरने खरिपाचे क्षेत्र वाढणार आहे. मका, उडीद, सोयाबीन पिकांना शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती असून, खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
रब्बीच्या हंगामाचा जिल्हा अशी प्रशासन दप्तरी सोलापूरची नोंद आहे.

मागील तीन वर्षांपासून जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने खरिपाची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रापेक्षाही एक ते दीड लाख हेक्टर
जास्तीच्या क्षेत्रावर खरिपाची लागवड होत असल्याने रासायनिक खते, बियाण्यांचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

जिल्ह्यात खताची उपलब्धता चांगली आहे. ठराविक कंपनीच्या खतांच्या आग्रहामुळे टंचाई निर्माण होऊ शकते. बियाणे पुरेसे उपलब्ध आहेत. यावर्षी खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागातर्फे नियोजन केले आहे. सोयाबीन आणि इतर गळीतधान्य उत्पादकता वाढ , मूल्यसाखळी विकास योजनांमध्ये बार्शी तालुक्याचा समावेश झाला आहे, अशी माहिती कृषी जिल्हा अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

● सोयाबीनचे माफक बियाणे उपलब्ध

सन २०२१ मध्ये ३ लाख ४० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. ६९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. गेल्यावर्षी पावसाची संततधार लागून राहिल्याने सोयाबीन पाण्यात अडकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

त्यामुळे यंदा बाजारपेठेत चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे घरगुती बियाणे उपलब्ध होत नसल्याने महागडी बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहेत. पेरणीसाठी १९ हजार ५४८ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र एक हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. सोयाबीनच्या तुलनेत तूर, मूग, उडीद, बाजरी, मका पिकाचे पुरेसे बियाणे उपलब्ध झालेले आहे.

 

□  बार्शीतील तलाव दुरूस्तीसाठी दहा कोटी मंजूर 

 

सातत्याने अवर्षण प्रवण असलेल्या बार्शी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच काही गावच्या पाणी पुरवठा योजनांना हातभार लागावा यासाठी शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने बार्शी तालुक्यातील रुई आणि सौंदरे या दोन पाझर तलावांच्या गळती दुरुस्तीसाठी शासनाकडून जवळपास 9 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.त्यामुळे लवकरच या दोन तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Kharif #sowing #increase #Solapur #district #Moderate #soybean #seeds #available, #सोलापूर #जिल्हा #खरिप #पेरा #वाढणार #सोयाबीन #माफक #बियाणे #उपलब्ध #शेती #शिवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Hardik Patel भाजपावर ‘टीका’ करणारे हार्दिक पटेल भाजपात ‘सामील’
Next Article पोटच्या मुलीच्या अत्याचार आणि हत्याप्रकरणी निर्दयी आई – बापास मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Latest News

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 25, 2025
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
नीरज चोप्राने ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकले
देश - विदेश June 25, 2025
इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?