सोलापूर : 3 जानेवारी 2022 रोजी सिकंदराबाद येथे धोलाराम बिष्णोई आणि आई पुनिकुमारी बिष्णोई या आरोपी जोडप्याने स्वतःच्या मुलीची हत्या केली. आधी वडिलांनी आईच्या संमतीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केला. दोघांना सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. Solapur, Rajasthan: Death penalty for cruelty and murder of unborn daughter
हा गुन्हा अत्यंत क्रूर असून यात सूट देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आला. या युक्तिवादानंतर कोर्टाने हि गोष्ट सरळ 31 साक्षिदारांच्या साक्षी नोंदवून या जोडप्याला फाशीची शिक्षा सुनावून संपवली.
एका सोळा महिन्याच्या चिमुकलीला दारू पाजून तिच्यावर नैसर्गिक, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना काल बुधवारीच दोषी धरले होते. आज गुरुवारी शिक्षेची सुनावणी होणार होती. त्यानुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/553040613040339/
धोलाराम अर्जुनराम बिष्णोई ( वय 26), त्याची पत्नी पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई ( वय 20, दोघे रा. बारासण, जि. बाडमेर, राजस्थान) असे न्यायालयाने दोषी धरलेल्या आरोपींचे नावे आहेत. ही घटना ३ जानेवारी २०२२ रोजी सिकंदराबाद – राजकोट एक्स्प्रेस रेल्वेमधून जात असताना सोलापूर रेल्वे स्थानकात उघडकीस आली.
या प्रकरणात आरोपींचा अपराध न्यायालयामध्ये सिध्द करण्यासाठी सरकार पक्षाच्यावतीने एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले. सदरचा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा तसेच डी.एन.ए. अहवाल याच्यावर आधारित असल्याने त्याच्याशी निगडित सर्व पुरावे सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये सादर केले.
हा खटला दुर्मिळातला दुर्मीळ असल्याने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, शिवाजी शिंदे यांच्या पथकाने केला.
● खटल्यातील ठळक मुद्दे
– पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बापाला आणि तिच्या आईला फाशीची शिक्षा
– सिकंदाराबाद येथे कामगार असणाऱ्या पित्याने आपल्या मुलीवर बापानेच अनैसर्गिक अत्याचार केला होता
– त्यानंतर तिला अल्कोहोल पाजून तिचा गळा आवळून खून केला
– 16 महिन्याच्या चिमुकलीवर बापानेच केला होता अत्याचार
– त्यानंतर सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस रेल्वेतून जात असताना प्रवशांना संशय आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना दिली होती कल्पना
– सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाने पाच महिन्यात सुनावली शिक्षा
– पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झाला होता गुन्हा
https://www.facebook.com/109399567404448/posts/553235803020820/