Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मविआचा प्रस्ताव भाजपने धुडकावला; राज्यसभा निवडणूक होणारच!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मविआचा प्रस्ताव भाजपने धुडकावला; राज्यसभा निवडणूक होणारच!

Surajya Digital
Last updated: 2022/06/03 at 5:37 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● विजयश्रीसाठी 42 मतांची आवश्यकता

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. पण त्यात त्यांना अपयश आले. भाजपने तिसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. भाजपने मविआचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर शिवसेनेनेसुद्धा दुसरी जागा लढण्याचा निर्धार केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती मात्र, कुठल्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. BJP rejects Mavia’s proposal; Rajya Sabha elections to be held!

राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 पर्यंत होती. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे शिवसेनेने रणनीती आखली. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेला मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळं शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी केली.

भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. मात्र, भाजपने ही विनंती अमान्य केली असून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीची ऑफर भाजपने स्वीकारली नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केलं.

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत आघाडीकडून भाजपला आणखी एक जागा देण्यात येईल, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांसमोर ठेवला होता. पण त्याला नकार देण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पण घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना ८ ते १० जून या कालावधीत मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजपकडून सहाव्या जागेवर धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय पवार मैदानात उतरले आहेत.

सहा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शिवसेनेचे प्रत्येकी एक भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे उमेदवार येणं अपेक्षित होतं. मात्र आता भाजपने धनंजय महाडीक यांची उमेदवारी मागे न घेतल्यानं निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन्ही बाजूने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहेत. आमच्याकडे तिसऱ्या उमेदवारासाठी 30 मते जादा आहेत. त्यामुळे आता अपक्ष, इतर पक्षांच्या मदतीवर आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनला विधान भवनात मतदान होईल. त्यापूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ८ जूनला मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते १० जूनपर्यंत तेथे असतील. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडा फोडी होऊ शकते, ही शक्यता गृहित धरुन शिवसेनेनं आतापासूनच रणनीती आखली आहे.

● विजयश्रीसाठी 42 मतांची आवश्यकता

 

उमेदवारांना विजयासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. सध्या भाजपचे १०६ आमदार असून,पक्षाला ५ अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.त्यामुळे भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी १५ मतांची आवश्यकता आहे.विधानसभेत शिवसेनेचे ५५ ( रमेश लटके यांचे निधन ) ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.विधानसभेत बहुजन विकास पक्ष ३, समाजवादी पार्टी २,एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मार्क्सवादी) १, शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य शक्ती पक्ष १.क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ असे छोट्या पक्षांचे १६ तर १३ अपक्ष आमदार आहेत.

अपक्षांपैकी मंजूळा गावीत, चंद्रकांत पाटील,आशिष जैसवाल,नरेंद्र भोंडेकर,किशोर जोरगेवार,गीता जैन.संजय शिंदे आणि राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करण्याची शक्यता आहे. तर प्रकाश आवाडे,राजेंद्र राऊत, महेश बादली,विनोद आग्रवाल आणि रवी राणा हे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे. मनसेचे एकमेव आमदार असून, मनसे भाजपला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

TAGGED: #BJP #rejects #mvaproposal #Rajyasabha #elections #held #politics #Maharashtra, #मविआ #प्रस्ताव #भाजप #धुडकावला #राज्यसभा #निवडणूक #होणारच, #संजयपवार #धनंजयमहाडीक #sanjaypawar #dhanjaymahadik
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Municipal elections महापालिका निवडणूक : ओबीसींची गणना करण्याचे आदेश;  घरोघरी जाऊन जनगणना करण्याचे नियोजन
Next Article Actresses no sex खासदार पतीने केला अभिनेत्री पत्नीवर आरोप; आठ वर्षांपासून संबंध ठेवू दिले नाहीत

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?