नवी दिल्ली : ओडिया चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि अभिनेते – लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांचा घटस्फोट चर्चेचे कारण ठरला आहे. यामध्ये झालेले आरोप-प्रत्यारोप याची सोशल मीडियावर चवीने चर्चा होताना ऐकायला मिळत आहे. MP’s husband accuses actress’ wife; Court Varsha Priyadarshini Anubhav Mohanty not allowed to have a relationship for eight years
अनुभव यांनी स्वतः सोशल मीडियावर अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध नव्हते. लग्नाला आठ वर्षे होऊनही ही परिस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने हे प्रकरण मोठा चर्चेचा मुद्दा बनलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, अनुभव मोहंती यांच्या याचिकांवर कटकच्या एडीजेएम न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/553735396304194/
‘आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली, पण इतकी वर्षे झाली तरी पत्नी वर्षा हिने संबंध ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. मी मानसिक तणावातून जात आहे. अजून किती दिवस कोणी वाट पहावी, मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे, पण प्रकरण आता कोर्टात आहे.’
अनुभव मोहंती यांच्या याचिकांवर कटकच्या एडीजेएम न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने वर्षा प्रियदर्शिनी यांना अनुभव मोहंती यांचे वडिलोपार्जित निवासस्थान दोन महिन्यांत रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अनुभव मोहंती यांनी वर्षाला देखभालीसाठी दरमहा 30 हजार रुपये देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
वास्तविक अनुभव मोहंती यांनी वर्षाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती की, त्यांनी त्यांचे वडिलोपार्जित घर सोडावे, मी तिच्यासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करण्यास तयार आहे. याशिवाय दुसऱ्या याचिकेत त्यांनी वर्षा यांच्या उत्पन्नाचे स्रोत उघड करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.
अनुभव मोहंती या सुप्रसिद्ध ओडिया चित्रपट अभिनेत्याने 2013 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी वर्षा प्रियदर्शिनीशी लग्न केले. मात्र, काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद झाल्याची बातमी समोर आली आणि पती-पत्नीचे नाते बिघडले. 2016 मध्ये पहिल्यांदा अनुभव मोहंती यांनी पत्नीविरोधात याचिका दाखल केली होती की, आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत, पण पत्नी प्रियदर्शिनी सेक्स करू देत नाही.
घटस्फोट प्रकरणात खासदार अनुभव मोहंती यांनी सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली, पण इतकी वर्षे झाली तरी पत्नी वर्षा हिने संबंध ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. मी मानसिक तणावातून जात आहे. अजून किती दिवस वाट पहावी, मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे, पण प्रकरण आता कोर्टात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553642259646841/