सोलापूर : दोन गटात वाढदिवसाच्या कारणावरून मुकुंदनगर येथे दगडफेक झाली. हा प्रकार आज शुक्रवारी (दि.३ जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या दगडफेकीत १०० लोकांचा जमाव जमला होता.त्या जमावामध्ये दगडफेकीत काही लोक जखमी झाले आहेत. पोलीस वेळेत आल्याने पुढील अनर्थ टळला. Stone throwing in Solapur for birthday reasons; Mukund Nagar averted disaster due to timely arrival of police
मुकुंद नगर परिसरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून भालशंकर व गायकवाड या दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूकडील लोकांनी रस्त्यांवरील दगड व विटा एकमेकांवर फेकल्या. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुकुंद नगर येथील सार्वजनिक रोडवर वाढदिवस साजरा करताना रहदारीला अडथळा झाला होता.
त्यावेळी भालशंकर व गायकवाड गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. दोन्ही गटाचा मोठा जमाव जमला. त्यावेळी दोन्ही गटांनी विटा व दगडफेक करण्यास सुरु केली. दरम्यान या संदर्भात जोडभावी पेठ पोलिसांना घटनेची माहिती समजताच तात्काळ त्याठिकाणी पोलिस दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून वाद मिटला.
जखमी झालेल्यांना लोकांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दरम्यान, वाढदिवस रस्त्यावर साजरा करणे हा गुन्हाच असून कायदा हातात घेणे हादेखील मोठा गुन्हा आहे. त्यामुळे दोन्ही गटातील व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल,अशी माहिती जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/554081682936232/
□ दौंड – इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी दौंड – इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आता रेल्वेत आणखीन जागा मिळणार आहे. अनारक्षित प्रवाशांची वाढती गर्दी व मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने दौंड-इंदूर एक्स्प्रेस डब्यात जनरल डबा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता या एक्स्प्रेसला २२ कोच असणार आहेत. यात ब्रेकयान १, एसी २ टियर २, एसी ३ टियर ६, स्लीपर ८, जनरल ४, गार्ड ब्रेकयान १ असे २२ डबे असणार आहेत.
कोच क्रमांक डी १ ते डी ३ हे २८ जून २०२२ पर्यंत आरक्षित असणार असून, २९ जून २०२२ पासून सर्व जनरल कोच अनारक्षित राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अतिरिक्त लागलेला कोच २ जून ते २९ जून २०२२ पर्यंत अनारक्षित राहणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554319739579093/