सोलापूर – एस. टी. बसस्थानक चौक ते निराळे वस्ती जाणाऱ्या रस्त्यावरील वेल्डिंगच्या दुकानात आज पहाटे ऑक्सिजन टाकीचा स्फोट होवून आग लागली. यात आजूबाजूची तीन दुकानही जळून खाक झाली आहे. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान झाले आहे. Five lakh loss due to explosion of oxygen tank, no loss of life
याबाबत मिळालेली माहिती अशी की, निराळे वस्ती रस्त्यावर नाल्यालगत काही वेल्डिंगची तसेच मोबाईल शॉपी दुकानं आहेत. वेल्डिंग दुकानात रात्री २.३० च्या सुमारास आग लागली. यावेळी 1 ऑक्सिजन टाकीचा स्फोट होवून मोठा आवाज झाला. काही वेळातच हे दुकान आणि बाजूची तीन दुकानं जळाली. यात वाहनं रिपेअरी, मोबाईल रिपेअरी याचीही दुकानं होतं. जवळपास ५ लाख रुपयांच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भागातील नागरिकांनी तसेच पोलीस आणि अग्निशमन दलानं वेळीच खबरदारी घेवून आगीवर नियंत्रण मिळविलं. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
□ बेरोजगारांसाठी एक चांगली बातमी
2021 च्या तुलनेत 2022 मध्ये देशातील अनेक क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी वाढली आहे. मे 2022 मध्ये देशातील विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. Naukri.com ने आपल्या सर्वेक्षणात (Naukri Survey) ही माहिती दिली आहे. देशातील पर्यटन आणि आरोग्य क्षेत्रातील नोकऱ्या आणि उद्योगात वाढ झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554465956231138/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ सोलापुरात सोमवारी शांता शेळके यांच्या गीतांचा कार्यक्रम
सोलापूर : हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संगीत विभागातर्फे ख्यातनाम कवयित्री गीतकार शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात त्यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम सोमवारी (६ जून) सायंकाळी ६.१५ वा. वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे.
□ दौंड – इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी दौंड – इंदूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आता रेल्वेत आणखीन जागा मिळणार आहे. अनारक्षित प्रवाशांची वाढती गर्दी व मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने दौंड-इंदूर एक्स्प्रेस डब्यात जनरल डबा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता या एक्स्प्रेसला २२ कोच असणार आहेत. यात ब्रेकयान १, एसी २ टियर २, एसी ३ टियर ६, स्लीपर ८, जनरल ४, गार्ड ब्रेकयान १ असे २२ डबे असणार आहेत.
कोच क्रमांक डी १ ते डी ३ हे २८ जून २०२२ पर्यंत आरक्षित असणार असून, २९ जून २०२२ पासून सर्व जनरल कोच अनारक्षित राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अतिरिक्त लागलेला कोच २ जून ते २९ जून २०२२ पर्यंत अनारक्षित राहणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554416206236113/