सोलापूर / मोहोळ : मोहोळ शहरातील नरखेड रोड उड्डाणपुलाखाली हॉटेल व्यवसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून, मारहाण केली. तसेच त्याच्या जवळ असलेली पैशाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान घडली.
विश्वराज विकास भोसले ३० वर्षे, (रा. मोहोळ) असे लूट झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी विश्वराज भोसले यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर हे करीत आहेत.
मोहोळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वराज भोसले यांचे सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ ते नरखेडला जाणाऱ्या पुलाजवळ शिवराज नावाचे हॉटेल आहे.
काल शनिवारी रात्री बारा वाजता भोसले हे नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून दिवसभर व्यवसायाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम रुपये ३९ हजार रुपये असलेली बॅग व चाव्यांचा जुडगा घेऊन मोटरसायकलने (एम.एच. १३ सी.झेड २९६) नरखेड रोड उड्डाण पुलाखालून सर्विस रस्त्याने मोहोळकडे जात होते.
रात्री १ वाजता अचानक एका मोटरसायकल वरून तिघेजण आले, त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्यांनी भोसले यांच्या मोटरसायकलीला त्यांची मोटरसायकल आडवी लावली. त्यापैकी एकाने भोसले यांच्या डोळ्यात आणि अंगावर चटणी टाकली. त्यामुळे भोसले खाली पडले. यावेळी त्या तिघांनी भोसले यांना बेदम मारहाण सुरू केली. खिसे तपासून दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग घेऊन पसार झाले. यावेळी चोरट्यांनी बॅगेतील चाव्यांचा जुडगा रस्त्यावर फेकून दिला.
डोळ्यात चटणी गेल्यामुळे भोसले आरडाओरड करू लागले. यावेळी याठिकाणाहून जात असणाऱ्या चारचाकीतील काही वाटसरूंनी भोसले यांना काय झाले असे विचारल्यानंतर त्यांनी घडला प्रकार सांगितला. त्यामुळे त्यांनी तातडीने भोसले यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555049432839457/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● ओळखीतून वीज मीटर ठेक्याचे आमिष दाखवून १५ लाखांला चुना
सोलापूर : जिल्ह्यातील एमएसईडीसीएलचे प्रिपेड इलेक्ट्रिसिटीचे मीटर बसविण्याचा ठेका देण्याच्या आमिष दाखवून १५ लाखांची फसवणुकीची घटना उघडकीस आली. ही घटना फेब्रुवारी २०२० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान सोलापुरातील राज हॉटेल येथे घडली. The hotelier was robbed of his electricity meter contract by throwing chutney in his eye
याबाबत निखिल सुधाकर सरवदे (वय ३०, रा. मिलिंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ विलास पाटोळे (वय ३४, रा. मोडनिंब) व निखिल विजयानंद अहिरराव (वय २७, रा. पंचवटी, नाशिक) यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि आरोपी पाटोळे हे एकमेकांना ओळखत होते. या ओळखीतूनच आरोपी पाटोळे याने नाशिकच्या इन्स्पायर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला प्रिपेड इलेक्ट्रिसिटीचे मीटर बसविण्याचे मोठे टेंडर मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यात मीटर बसविण्याचे काम जिल्ह्यात मीटर बसविण्याचे काम तुम्हाला देतो, परंतु त्यासाठी १५ लाख रुपये लागतील असे फिर्यादीला सांगण्यात आले. मीटर बसविण्याचा मोठा ठेका मिळणार या आशेतून फिर्यादी पैसे देण्यास तयार झाले. त्यानंतर रोख तीन लाख रुपये देण्यात आले. पुढे दोन तीन लाख तसेच एक लाख लाख, तीन लाख तसेच एक लाख असे १५ लाख रुपये आरोपीला
दिले.
जुलै २०२० पर्यंत कागदपत्रांची पूर्तता होऊन मीटर तुमच्या ताब्यात देण्यात येतील, असे आरोपी पाटोळे याने सांगितले. परंतु जुलैअखेर संपला तरी मीटर मिळाले नसल्याने फिर्यादीने आरोपीकडे चौकशी केली. तेव्हा नोव्हेंबरपर्यंत काम नक्की होईल, असे आश्वासन दिले. नोव्हेंबर २०२१ मध्ये शासनाने मक्ता रद्द केल्याची माहिती आरोपीने फिर्यादीला दिली. त्यावर फिर्यादीने दिलेल्या १५ लाखांची मागणी केली परंतु पैसे देण्यास अद्याप टाळाटाळ करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विकास देशमुख हे अधिक तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555033809507686/