Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंगळवेढ्याजवळ मोटार उलटून सांगलीचे १० प्रवासी जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मंगळवेढ्याजवळ मोटार उलटून सांगलीचे १० प्रवासी जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/06/06 at 12:35 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ अर्जुनसोंड येथे मारहाण; पती पत्नी जखमीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ नशेत गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न□ शेळगी येथे लोखंडी गजाने मारहाण करून जखमी

सोलापूर – मंगळवेढ्याजवळ मारुती ओमिनीला पाठीमागून वाहन धडकल्याने ओमिनी उलटून १० प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता. 4) रात्रीच्या सुमारास घडला. सर्व प्रवासी तासगाव (जि.सांगली) येथील असून ते सर्वजण अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. 10 passengers of Sangli injured in Solapur accident

विनोद पवार (वय ३५), गिरीजा पवार (वय ३२), सुनिता साळुंखे (वय ३०), निशा साळुंखे (वय २३), दीक्षा पवार (वय १४), गणेश पवार (वय २१), अक्षय पवार (वय २६), पूर्वा साळुंखे (वय २१), अनिता पवार (वय२०) आणि वैदही साळुंखे (वय ५ वर्षे  सर्व रा. तासगाव जि.सांगली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सर्वजण तासगाव ते अक्कलकोट येथे  देवदर्शनासाठी निघाले होते.

रात्री १२:३० वाजेच्या सुमारास मंगळवेढा पासून दहा किलोमीटर अंतरावर पाठीमागून दुसरे वाहन धडकल्याने मोटार उलटून सर्व जण जखमी झाले. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ अर्जुनसोंड येथे मारहाण; पती पत्नी जखमी

 

अर्जुनसोंड (ता.मोहोळ) येथे भावकीतील शेतीच्या वादातून काठीने केलेल्या मारहाणीत योगेश नागनाथ हावळे (वय ३०) आणि त्यांची पत्नी सारिका हावळे (वय २८) हे दोघे जखमी झाले. ही घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. योगेशचा भाऊ सोमनाथ हावळे याने मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/555616462782754/

□ नशेत गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

 

पंढरपूर येथील संतपेठेत राहणाऱ्या जीवराज पांडुरंग गायकवाड (वय ५०) याने दारुच्या नशेत गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. 4) दुपारच्या सुमारास घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून (मुलगा) रोहित याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

□ शेळगी येथे लोखंडी गजाने मारहाण करून जखमी

 

शेळगी परिसरातील सुपर हॉल येथे लग्नात झालेल्या किरकोळ भांडणावरून लोखंडी गज आणि हाताने केलेल्या मारहाणीत मुबारक बाशु कुचनाळ (वय ३० रा.भवानी पेठ) हा जखमी झाला.

ही घटना रविवारी (ता.5) दुपारच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शफिक कान्याल आणि अन्य सहा जणांनी मारहाण केली. अशी नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/555600299451037/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #passengers #sangli #injured #Solapur #accident, #मंगळवेढा #मोटार #उलटून #सांगली #प्रवासी #जखमी #सोलापूर #अपघात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील गोशाळेतील गोवऱ्याची विदेशात निर्यात
Next Article गॅसच्या काळ्या बाजारात राष्ट्रवादीचे उपाध्यक्षा विद्या लोलगेंचे नाव

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?