□ दारू पिवून वाहन चालविणाऱ्या ४० जणांवर न्यायालयात खटले
□ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या रडारवर
सोलापूर – शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४० जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. मद्यपी वाहनचालक आता पोलिसांच्या रडारवर असल्याचे दिसून आले. Twelve alcoholics’ vehicle licenses suspended in Solapur
वाहनचालक मद्यप्राशन करुन वाहने धोकादायकरीत्या चालवित असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने नूतन पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्या वाहनचालकांची वाहने ताब्यात घेवून खटला थेट कोर्टात पाठविण्यास सुरुवात केली आहे.
४ व ५ जून रोजी महत्त्वाच्या चौकात अचानकपणे विशेष मोहीम राबवून मद्यप्राशन, करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी केली असता एकूण ४० वाहनचालक मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर ठोस कारवाई होण्याच्या दृष्टीने त्यांची वाहने ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द न्यायालयात थेट खटले दाखल करण्यात आले आहेत.
मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या चालकांवर सातत्याने अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असून कोणीही मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये, मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास त्यांचे वाहन करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. दीपाली धाटे यांनी दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/556356279375439/
□ सोलापुरातील १२ मद्यपींचे वाहन परवाने निलंबित
सोलापूर : वारंवार समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या मद्यपी वाहनचालकांना मोटार वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. १२ वाहनचालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
दारूच्या नशेत वाहनचालकांवर शिस्त लावण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जाते. दारूच्या नशेत वाहन चालविल्यास हमखास अपघात होतात. त्यात अनेकदा निष्पाप व्यक्तीचा बळी जातो. अपघातामुळे संबंधितांना अनेकदा जीवघेण्या जखमा होऊन अपंगत्व येते आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे.
त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालवू नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून दारूड्या वाहनचालकांविरुद्ध ड्रंक ॲण्ड ड्राइव्हची कारवाई केली जाते. त्यात वाहनचालकांकडून जुजबी दंडाची रक्कम वसूल केली जाते. या कारवाईला अनेक वाहनचालक जुमानत नाहीत. कारवाई झाल्यानंतरही ते दारूच्या नशेत वाहन चालवितात. अशा वाहनचालकांची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
शहरात सर्व परिमंडळांत कारवाईत वारंवार दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर पुराव्यासह मोटर वाहन न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. परिवहन विभागालाही वारंवार कारवाई आणि न्यायालयातून शिक्षा ठोठावूनही दारूडे वाहनचालक जुमानत नसतील तर अशा वाहनचालकांचे लायसेन्स रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाला कळवावी, असेही या आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे.
दारूच्या नशेत वाहन चालविणे किंवा वारंवार वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १२ वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. मागील वर्षभरातील स्थिती वाहतूक पोलिसांनी परिवहन विभागाकडे पाठविली असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/556345076043226/