Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Twelfth result बिगब्रेकिंग – उद्या बारावीचा निकाल, पहा येथे निकाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

Twelfth result बिगब्रेकिंग – उद्या बारावीचा निकाल, पहा येथे निकाल

Surajya Digital
Last updated: 2022/06/07 at 5:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी वाट पाहत आहेत. अशातच आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण बारावीचा निकाल उद्या बुधवारी लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. Big Breaking – Twelfth result tomorrow

बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला.  गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या बारावीचा निकाल लागणार आहे. कोरोना आटोक्यात आल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. राज्यातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना या निकालाची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1534108931798142977?t=sgSmJyw8CuPYb4DYoAj_5g&s=19

उद्या दुपारी एक वाजता www. mahahsscboard.in या बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या परीक्षेचा सीट नंबर आणि आईचं नाव माहिती असणे आवश्यक आहे.

८ जून, २०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.

 

उद्या बारावीचा निकाल, येथे पाहू शकता उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वी परीक्षेचा निकाल लागणार आहे. विद्यार्थी आणि पालक याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

– mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या..

– होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

• तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.

– “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / बारावीचा निकाल 2022 स्क्रीनवर

दिसेल.

https://hscresult.11thadmission.org.in
maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जावून निकाल पाहू शकता.

होमपेजवर, MSBSHSE १२ वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/556356279375439/

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Big #Breaking #Twelfth #result #tomorrow #12th, #बिगब्रेकिंग #उद्या #बारावी #निकाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एमआयएमची शिवसेनेला ऑफर; राज्यसभेसाठी खुलेपणाने मदत मागा
Next Article विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना संधी ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?