Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कन्नड भवनाच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो : पालकमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कन्नड भवनाच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो : पालकमंत्री

Surajya Digital
Last updated: 2022/06/07 at 8:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचे भूमिपूजन संपन्न

सोलापूर : वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचा वापर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी येणाऱ्या जगतगुरू महाराजांच्या निवासासाठी होणार आहे. या भवनातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना चांगली अभ्यासिका करावी. या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. Make good administrative officers through Solapur Kannada Bhavan: Guardian Minister

Contents
● वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचे भूमिपूजन संपन्नस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ दीड वर्षांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार□ महात्मा बसवेश्वर महाराजांचेही स्मारक

कुंभार वेस येथील जयभवानी मैदानात वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य, जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, धर्मराज काडादी, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमल आदींसह लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, कन्नड भवनाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व्हावेत. भवनाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. जिल्हा नियोजन समितीतून एक कोटींचा निधी दिला जाईल. जनतेच्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर निधीची कमतरता नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/556356279375439/

 

गेल्या दोन वर्षात कोरोना संकट होते, याचा मुकाबला आपण केला. कोरोना काळात खाजगी दवाखान्यांनी ओपीडी बंद केली होती, डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना ओपीडी सुरू करण्यास सांगितले. कोरोना काळात सुरूवातीला भीती होती, कोणी कोरोना रूग्णाजवळ जात नव्हते. मात्र पालकमंत्री सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात जावून रूग्णांची विचारपूस केली. स्वच्छता, अन्न, पाणी यांची योग्य सोय असल्याची खात्री केली असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

□ दीड वर्षांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार

 

सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी चार-चार दिवस वाट पाहावी लागत आहे, हे दुर्देव आहे. येत्या दीड वर्षात समांतर पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यामुळे सोलापूरकरांना रोज पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

□ महात्मा बसवेश्वर महाराजांचेही स्मारक

 

मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक नियोजित आहे. यासाठी 45 एकर जागा मंजूर झाली असून महात्मा बसवेश्वर महाराजांचे चांगल्या प्रकारचे स्मारक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महेश कोठे यांनी सांगितले की, कन्नड भवनाचा वापर लिंगायत समाजातील मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी केला जाईल. मुलांच्या राहण्याची, अभ्यासाची सोय येथे होणार आहे. बहुउद्देशीय सभागृह म्हणून कन्नड भवनचा उपयोग होणार असल्याचे म्हटले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/556494316028302/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #good #administrative #officers #Solapur #Kannada #Bhavan #GuardianMinister, #कन्नड #भवन #सोलापूर #चांगले #प्रशासकीय #अधिकारी #पालकमंत्री #दत्तात्रयभरणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना संधी ?
Next Article Ketki Chitale सत्तेचा गैरवापर करुन मला अटक केली, केतकीची हायकोर्टात धाव

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?