मुंबई : शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर लिहिल्या प्रकरणी गेल्या 23 दिवसांपासून अभिनेत्री केतकी चितळे अटकेत आहे. याच प्रकरणी तिने आता थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. ‘वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमधील तक्रारींच्या आधारे दाखल करुन घेण्यात आलेल्या सर्व एफआयआर बेकायदा आहेत, आपल्याला अटक करताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्याचा भंग करण्यात आला आहे, त्यामुळे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तिने केली. I was arrested for abusing my power, Anil Deshmukh ran for bail in Ketki Chitale High Court
दरम्यान , याप्रकरणी अटकेत असलेल्या 22 वर्षीय निखिल भामरे या विद्यार्थ्यानं त्याच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या खटल्यातील कागदपत्र आणि इतर तपशील सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देत याचिकाकर्त्याला पहिल्याच सुनावणीत जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. भामरे यानेही शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. निखिल भामरे नामक तरूण फार्मासिस्ट आहे.
बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं (Ketaki Chitale) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली आहे. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/556586976019036/
याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून ती सध्या कारागृहात आहे. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला असून याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील केतकीची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एक दिवसाचा जामीन देण्यात येऊ नये अन्यथा ते फरार होतील, असा दावा केतकीने केला आहे. देशमुखांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. याविरोधात केतकीने अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे देखील टेन्शन वाढलं आहे.
केतकीने देशमुखांच्याविरोधात केलेल्या अर्जात असे म्हटलं आहे की, देशमुखांनी एका दिवसासाठी जामीन मागितला आहे. परंतु त्यांना जामीन देण्यात येऊ नये. जामीन दिल्यास ते फरार होतील. त्यांना शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि ईडीला सहकार्य करणार नाहीत. अनिल देशमुख मिळत नाही असा दावा केतकीने केला आहे. यामुळे देशमुखांची अडचण वाढली आहे.
● दूरदर्शनचा भारदस्त आवाज हरपला
News correspondent Pradip Bhide
प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन दूरदर्शनवरील ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. आपल्या भारदस्त आवाजामुळे ते ओळखले जात होते. बातम्या सांगण्याची त्यांची खास शैली होती. 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. वयाच्या 21 व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली. त्यांनी तब्बल 25 वर्ष वृत्तनिवेदन केले. 1980 मध्ये त्यांनी खार येथे प्रियंका स्टुडिओची स्थापना केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/556585176019216/