जयपूर : राजस्थान विधानसभेचे सत्र उद्या 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राजस्थान विधानसभेत भाजपने अशोक गहलोत सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात अशोक गहलोत यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले, असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. भाजपाच्या बैठकीमध्ये राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा सत्राअगोदर सायंकाळी पाच वाजता अशोक गहलोत यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. यामध्ये सचिन पायलट आणि त्यांच्या मतदारसंघाच्या आमदारांनाही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे. सचिन पायलट आणि अशोक गहलोत या बैठकीत भेट घेतील. केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.