सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. 94.15 percent result of 12th standard in Solapur
सोलापूरातून ३१ हजार ७४५ मुलांनी परिक्षा दिली. यातील २९ हजार ४४५ मुलं पास झाली, तर २२ हजार ७३४ मुलींनी परिक्षा दिली, त्यातील २१ हजार ८५० मुली पास झाल्या. एकूण ५४ हजार ४७९ विद्याथ्यांपैकी ५१ हजार २९५ विद्यार्थी पास झाले आहेत विज्ञान विभागाचा निकाल ९८.८३, कला ९०.५७, वाणिज्य ९२.५५ टेक्निकल ८३.३०, तर व्हिओसी ८८.४३ टक्के निकाल लागला आहे.
– सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.१५
– सायन्स शाखेचा ९८.८३ टक्के, कॉमर्स शाखेचा ९२.५५ तर आर्ट शाखेचा ९०.५७, व्होकेशनल ८८.४३
– राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ५१ हजार २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१५ टक्के इतका आहे.
– मुलीं ९६.११ टक्के तर मुले ९२.७५ टक्के उत्तीर्ण झाले. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/557166589294408/
□ यंदा बारावीचा निकाल 94.22 टक्के; आता पुढील प्रवेशासाठी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा
मुंबई : सर्व विद्यार्थी, पालकवर्गाच्या नजरा बारावीच्या निकालावरती लागल्या होत्या. अखेर निकाल जाहीर झाला आहे. मुलापेक्षा निकालात मुलींच आघाडीवर आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या वर्षी भरभरून म्हणजेच 94.22 टक्के इतका बारावीचा निकाल लागला आहे.
नीट ऑनलाईन फॉर्म प्रिंट, नीटप्रवेश पत्र, नीट मार्क लिस्ट, 10 वी- 12 वी मार्कशिट आणि सर्टीफिकेट, नॅशनॅलीटी सर्टीफिकेट, रहिवाशी प्रमाणपत्र, 12 वी दाखला, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, राष्ट्रीय बँकेतील खाते, पॅन कार्ड, MHT-CET ऑनलाईन फॉर्म प्रिंट, MHT-CET पत्र, MHT-CET मार्क लिस्ट तसेच मागासवर्गीयांसाठी जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा विभागवार निकाल दिला आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहिला जात आहे. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल 97.21 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा 95.7 टक्के लागला आहे. राज्यात यावर्षीही मुलींनी निकाल बाजी मारली आहे.
सकाळी निकालाची घोषणा झाल्यावर त्यात ९६.५२ टक्क्यासह नागपूर विभागाने राज्यात दुसरे स्थान पटकाविले. विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९७.३७ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९९.३१ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ९३.४२ टक्के लागला आहे.
यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557045175973216/
– कोकण विभाग: 97.21 टक्के
– पुणे : 93.61
– नागपूर: 96.52
– औरंगाबाद: 94.27
– मुंबई : 90.91
– कोल्हापूर : 95.07
– अमरावती: 96.34
– नाशिक: 95.03
– लातूर : 95.25
– एकूण: 94.22
□ मुली : 95.35
□ मुलं: 93.29