सोलापूर/ मोहोळ : विजयपूर- मोहोळ महामार्गांवरील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे बँक ऑफ इंडियाची एटीएम आहे. हे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापून त्यातील रोकड चोरट्याने मोठ्या शिताफीने चोरली आहे. या चोरीने गावात मोठी खळबळ माजली आहे. 23 lakh cash stolen from ATM in Kurul Solapur Mohol
या २२ लाख ९९ हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कुरुल येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. परंतु येथे सुरक्षा रक्षक नियुक्त केलेला नाही. त्यामुळे चोरट्यांना आयतीच संधी मिळाली. चोरट्याने सतत पाळत ठेवून हे एटीएम फोडले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. ८ जून रोजी पहाटे ३. वाजून २२ मिनिटानी एक काळे जर्किन घातलेला इसम वीस ते पंचवीस वर्षाचा एटीएम रूम मध्ये आला व या एटीएम रूममधील असलेल्या कॅमेऱ्यावर हिरव्या रंगाचा स्प्रे मारला. नंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा दरवाजा उचकटला. चोरट्यानी त्यातील रोकड बॅगेत भरून चोरून नेली.
अज्ञात युवक चोरट्याने तोंडाला फडके बांधलेले अवस्थेत या मशीन मध्ये प्रवेश करून प्रथम त्याने सीसीटीव्ही कॅमेरा वर रासायणीक हिरव्या रंगाचा स्प्रे मारून ते बंद करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बाहेर उभे असलेल्या तिघा साथीदारां पैकी एकाने त्यांनी बरोबर आणलेल्या गॅस कटर च्या साह्याने एटीएम केंद्राची मशीन तोडून यातील 22 लाख 99 हजार रुपयांची रोकड लांबवली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/557166589294408/
इलेक्ट्रिक मॅनेजमेंट अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एटीएम देखभाल व दुरुस्ती करणारे अमोल पवार (रिजनल मॅनेजर) आणि त्यांचे साथीदार रवि इंजापुरी यांना फोनवरून आयटी ऑफीसर अनिकेत पाठक यांनी कुरुल गावातील बँक ऑफ इंडिया शाखा कुरुल चे एटीएम मशीन फोडल्याचे सांगितले.
सदर घटनेची फिर्याद अमोल अरुण पवार यांनी कामती पोलीस ठाण्यात दिली. यावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. या चोरीचा कामती पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
□ सोलापूरचा बारावीचा निकाल 94.15 टक्के
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे.
सोलापूरातून ३१ हजार ७४५ मुलांनी परिक्षा दिली. यातील २९ हजार ४४५ मुलं पास झाली, तर २२ हजार ७३४ मुलींनी परिक्षा दिली, त्यातील २१ हजार ८५० मुली पास झाल्या. एकूण ५४ हजार ४७९ विद्याथ्यांपैकी ५१ हजार २९५ विद्यार्थी पास झाले आहेत विज्ञान विभागाचा निकाल ९८.८३, कला ९०.५७, वाणिज्य ९२.५५ टेक्निकल ८३.३०, तर व्हिओसी ८८.४३ टक्के निकाल लागला आहे.
– सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.१५
– सायन्स शाखेचा ९८.८३ टक्के, कॉमर्स शाखेचा ९२.५५ तर आर्ट शाखेचा ९०.५७, व्होकेशनल ८८.४३
– राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ५१ हजार २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१५ टक्के इतका आहे.
– मुलीं ९६.११ टक्के तर मुले ९२.७५ टक्के उत्तीर्ण झाले. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557045175973216/