Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने युवा क्रिकेटपटूची आत्महत्या; आत्महत्या करण्यापूर्वी केला मित्राला फोन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळमहाराष्ट्र

आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने युवा क्रिकेटपटूची आत्महत्या; आत्महत्या करण्यापूर्वी केला मित्राला फोन

Surajya Digital
Last updated: 2020/08/13 at 6:48 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आयपीएलमध्ये आपल्याला संधी मिळेल, असे मुंबईच्या एका युवा क्रिकेटपटूला वाटत होते. पण यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे  युवा क्रिकेटपटूने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मुंबईत घडली.

करण तिवारी असे आत्महत्या केलेल्या युवा क्रिकेटपटूचे नाव आहे. निराश झालेल्या युवा क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याचे मुंबईच्या पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे. मुंबईमधील कुरार पोलिस स्टेशनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यामुळे मुंबईचा युवा क्रिकेटपटू करण तिवारी हा निराश झाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

करणने ही गोष्ट उदयपूर येथे राहणाऱ्या आपल्या सर्वात जवळच्या मित्राला फोन करून सांगितली. त्याचबरोबर आपण निराश झाल्यामुळे आत्महत्या करायला जात आहोत, असेही त्याने आपल्या मित्राला सांगितले. त्यानंतर या मित्राने त्याच्याच शहरात राहणाऱ्या करणच्या बहिणीला फोन करून ही माहिती दिली.

करणच्या बहिणीने त्याच्या आईला ही गोष्ट त्वरीत सांगितली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण तोपर्यंत आपल्या रुमचा दरवाजा बंद करून करणनने आत्महत्या केली होती. त्यानंतर करणला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. करणसोबत त्याची आई आणि भाऊ राहत होता.  गेल्या काही वर्षांपासून करण तिवारी संधीची वाट पाहत होता, असे त्याचा मित्र आणि अभिनेता जितू वर्मा याने सांगितले. मुंबईच्या सिनिअर संघाचे कोच विनायक सामंत यांनी सांगितले की, त्यासाठी चांगला क्रिकेट क्लब आम्ही शोधत होतो.

* आयपीएलचे आकर्षण आणि निराशा

आयपीएलमध्ये खेळलो की आपण प्रसिद्ध होतो आणि त्यानंतर बऱ्याच संधी आपल्याला मिळतात, असा युवा क्रिकेटपटूंचा ग्रह आहे. त्यामुळे काहीही करून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी आपल्याला लवकर मिळायला हवी, यासाठी युवा खेळाडू प्रयत्नशील असतात. पण आयपीएल सोडल्यास अन्य क्रिकेटचा ते जास्त विचार करत नाहीत. त्यामुळे आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही तर क्रिकेटपटू निराश होतात.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #आयपीएल #संधी #क्रिकेटपटू #आत्महत्या #तिवारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजस्थानमध्ये भाजप आणणार अविश्वासाचा ठराव; गेहलोत सरकारला बहुमताची द्यावी लागणार परीक्षा
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये पाच मृत्यू तर 241 नवे रूग्ण; रूग्ण संख्या झाली 6 हजार 772

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?