सोलापूर : कारागृहात हवालदार पदावर काम केलेल्या कल्याण दगडू गावसाने यांनी सोलापुरात राहत्या घरी काल गुरूवारी (ता.9 ) सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. Retired police constable hanged in Solapur
असाध्य आजारानंतर उस्मानाबादहून गावसाने यांची नाशिकला बदली झाली होती. उपचारासाठी पैसे कमी पडत असल्यानं त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. मात्र त्यांचे शासकीय देय रक्कम त्यांना मिळालेली नव्हती. ते नाशिक कारागृहात कार्यरत होते. नाशिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेवूनही हे काम करत नसल्यानं ते त्रस्त होते. यामुळंच त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पत्नी आणि मुलानं प्रसारमाध्यमांशी बोलताना आज दिली. गावसाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे.
कल्याण गावसाने यांनी सोलापुरातील माशाळ वस्ती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावसाने यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सेवा निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी कारागृह प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत हवालदाराच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कल्याण गावसाने यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्यांना पेन्शनसाठी मानसिक त्रास दिला जात होता त्यामुळे या आत्महत्ये प्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील आवारे मॅडम आणि गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावसाने कुटुंबीयांनी प्रशासनाला दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/558258275851906/
□ नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी घेतला पदभार
सोलापूर : सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास अतिरिक्त पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या कडून पदभार घेतला. बुधवारी राज्य गुप्तवार्ता मुंबई विभागाचे उपायुक्त राजेंद्र माने यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाली होती.
पदभार घेतल्यानंतर पोलीस आयुक्त माने म्हणाले, 2009 ते 2012 या तीन वर्षात मी सोलापूरमध्ये उपायुक्त पदावर काम केले आहे. सोलापूरच्या जनतेचा मला चांगला अंदाज असून सोलापूर शहरात सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात. त्यामुळे मला सोलापूरचा अनुभव असल्याने येणाऱ्या काळात सोलापूरमध्ये चांगली पोलिसिंग करू, असा आशावाद व्यक्त केला.
हरिष बैजल नुकतेच सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांच्याकडे पदभार दिला होता. नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी आज पदभार घेतला. राजेंद्र माने यांनी यापूर्वी २००९ ते २०१२ या कालावधीत पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले होते.
नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने हे तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्य काळात एक वर्ष व हिम्मतराव देशभ्रतार यांच्या कार्यकाळात दोन वर्ष असे तीन वर्ष उपायुक्त म्हणून कार्यरत होते.
तत्कालीन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये रुजू झाले. अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त हरिष बैजल हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांच्याकडे पदभार दिला होता.
बुधवारी (ता.8 ) काढण्यात ओलल्या आदेशामध्ये राजेंद्र माने सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली केल्याचे नमूद केले आहे. राजेंद्र माने हे २००९ ते २०१२ या तीन वर्षात सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.
तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्यकाळात त्यांनी एक वर्ष तर त्यानंतरचे पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांच्या कार्यकाळात दोन वर्ष पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना सोलापूरची संपूर्ण माहिती आहे.
नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी यूपीएससी परीक्षेतून १९९५ साली डीवायएसपी म्हणून पोलीस खात्यात रुजू झाले होते. वर्धा, गडचिरोली, औरंगाबाद ग्रामीण, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, लातूर अन सध्या राज्य गुप्तवार्ता मुंबईचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. आता ते सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/558340765843657/