सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज गुरूवारच्या अहवालानुसार नव्याने 241 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 161 रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 6 हजार 772 एवढी झाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानुसार एकूण 3 हजार 13 जणांची तपासणी केली. त्यापैकी दोन हजार 772 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 241 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 101 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याखालोखाल बार्शी 38 आणि उत्तर सोलापूर तालुक्यात 23 रूग्ण आढळून आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज गुरूवारी अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, अकलूज येथील 65 वर्षीय पुरुष, डिकसळ (ता. मोहोळ) येथील 60 वर्षीय पुरुष, भोसे (ता. पंढरपूर) येथील 58 वर्षीय पुरुष तर सुतारगल्ली करमाळा येथील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 6 हजार 772 एवढी झाली आहे. यापैकी 3 हजार 850 रूग्ण बरे झाले असून 2 हजार 728 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 194 जणांचा मृत्यू झाला आहे.