● आषाढी वारीसाठी चार हजार एसटी सोडण्याचे नियोजन
सोलापूर – रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण केले आहे. आषाढी एकादशी पूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे वज्रलेप धरले पूर्ण होणे गरजेचे आहे. मध्यरात्री १२ ते पहाटे ४ या काळात पहिला टप्पाचे काम झाले. तर आज दुपारी १२ ते ७ वाजेपर्यंत चरणांची झालेली झीज भरून काढली. जवळपास ११ तास वज्रलेप करण्यासाठी वेळ लागला आहे आता २ दिवसानंतर भाविकांना रुक्मिणी मातेच पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती दिली आहे.
दोन दिवसांपासून सुरु असलेली देवीच्या मूर्तीवरील वज्रलेपाची प्रक्रिया आज रविवारी दुपारी पूर्ण झाली. वज्रलेपानंतर श्रींचे चरण पूर्ववत झाले आहेत. या रासायनिक लेपनानंतर पुढील दोन दिवस श्री रुक्मिणीमातेचे नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद राहणार आहे.
मूर्ती संवर्धनाबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाला या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या.
काल शनिवारी रात्री 11 वाजता लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत लेपनाचे काम सुरु होते. या प्रक्रियेला जवळपास 12 तासांचा अवधी लागला. संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वज्रलेप प्रक्रिया पार पडली. श्री रुक्मिणीमातेच्या चरणांची झालेली झीज व मंदिर समितीने केलेले दुर्लक्ष या बाबीमुळे भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559829232361477/
माध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने पंढरपूर गाठत मूर्तीची पाहणी केली. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर इफोक्सी सिलिकॉन लेप करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
□ चरणांची काळजी घेण्याचे आवाहन
रुक्मिणी मातेची मूर्ती शालिग्राम दगडाची आहे. या मूर्तीवर वज्रलेप दोन ते चार वर्षेच टिकतो. सध्या इफोक्सीचे सिलिकॉन लेपन करण्यात आले आहे. पदस्पर्शदर्शन, मूर्तीला होणारे नित्योपचार पाणी, दही, दूध, मध याचे प्रमाण मंदिर समितीने कमी करून नित्यपचार करावेत. रुक्मिणी मातेच्या चरणावर केलेला वज्रलेप जास्त दिवस राहील. मंदिर समितीच्या कर्मचारी पुजारी व्यक्तीने रुक्मिणी मातेच्या चरणाला कोणत्याही प्रकारची इजा, धक्का लागू नये, याची काळजी घ्यायची आहे.
– श्रीकांत मिश्रा, भारतीय पुरातत्त्व विभाग, संभाजीनगर (औरंगाबाद)
□ आषाढी वारीसाठी चार हजार एसटी सोडण्याचे सोलापूर विभागाचे नियोजन
सोलापूर : यंदाच्या आषाढी वारीसाठी एसटी महामंडळातर्फे नियोजन सुरू आहे. राज्यभरातून चार हजार गाड्या सोडण्याची तयारी आहे. याबाबत २४ जून रोजी होणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर निर्णय होणार असल्याचे विभागीय अधिकारी सुरेश लोणकर यांनी सांगितले.
कोरोना आणि कर्मचारी संपामुळे गेल्या दोन वर्षात एसटीचे योग्य नियोजन झाले नव्हते. यंदा चांगली तयारी करण्यात आली आहे. यंदा किमान चार हजार गाड्या संपूर्ण राज्यात सोडण्यात येणार आहेत.
शिवाय, जिल्हा प्रशासनाकडून काय प्रस्ताव असणार आहे, यावर चर्चा झाल्यानंतर आकडेवारी जाहीर होईल.
१४ जूनला एसटी महामंडळ आणि जिल्हा प्रशासन मिळून या सर्व गोष्टी ठरवतील. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ वर्षाकाठी पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल – रुक्मिणीच्या आषाढी वारीकरिता राज्यातील इतर विभागाच्या दीड ते दोन हजार गाड्या मागवतात. यंदा याचे प्रमाण अधिक असणार आहे. येणारी आषाढी वारी एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून सेवा देण्यासाठी सर्वात मोठी असावी, असा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/559794452364955/