□ केदारनाथ पर्वतावरचा थरार…
□ उत्तराखंड प्रशासन मदतीला धावले
□ केंदारनाथवर शंकराच्या ‘उदय’ ने संकट लोपले
सोलापूर : समाजातील मानवता पाहिल्यानंतर ‘कठीण समयी कोण कामास येई’ ही आध्यात्मिक म्हण त्यापुढे अपवाद ठरते. या जगात सत्य राहिले नाही. माणुसकी राहिली नाही, अशी खंत आज नेहमीच व्यक्त होत असते. पण तसे नाही. सत्य आहे. माणुसकीचीही आहे. असाच प्रसंग… Dadashri’s humanity overwhelmed Solapur; The couple returned safely, Shankara’s ‘Uday’ over Kendarnath ended the crisis
एकमेकांबद्दल आदरभाव – प्रेम आणि जिव्हाळाही आहे. त्याचा प्रत्यय सोलापुरातूनच आला आहे. केंदाननाथ येथील डोंगरावर सोलापुरातील पती-पत्नीवर एक मोठे संकट आल्यानंतर सोलापुरातीलच एका नेत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांना मदतीचा हात दिला. त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडत हे दाम्पत्य शनिवारी सोलापुरात सुखरूप पोहचले. ज्यांच्या घरात दुसऱ्यांसाठी मदत करण्याची पूर्वीपार पुण्याई चालत आली आहे, त्या उदयशंकर पाटील यांनी मानवतेचा आदर्श जोपासला. त्याबद्दल त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
त्याचे असे झाले की – सोलापूरच्या रेल्वे स्टेशन समोरील प्रथम चंचलकर व त्यांच्या पत्नी हे आठवड्यापूर्वी (मागील शनिवारी) केदारेश्वरला गेले होते. तिथल्या पर्वतावर चढाई करत असताना ऑक्सिजनच्या कमतरेचा पत्नीला त्रास होऊ लागला. त्या गर्भवती असल्याने पती प्रथमेश हे घाबरले. मदतीसाठी त्यांची धावाधाव सुरू झाली. सायंकाळ होत आली होती.
हेलिकॉप्टरची शेवटची फेरीही होऊन गेली. तेथील दुर्गम भागात तसेच नवीन अनोळखी ठिकाणी उपचारासाठी कोणाला मदत मागावी कळेना. केदारनाथ पर्वतावरून खाली उतरून उपचार द्यायचे होते. समयसूकता दाखवून त्यांनी सोलापूरला पहिल्यांदा पृथ्वीराज थोरात यांना फोन करून मदतीची मागणी केली. थोरात यांनी लागलीच उदयशंकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते कोल्हापुरात होते.
थोरात यांनी सारी हकीकत सांगितल्यानंतर उदयशंकर यांनी तातडीने हालचाली केल्या. दिल्लीतील काही अधिकारी व उद्योजक यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यानंतर सारी सूत्रे हालली. केदारनाथ इथे राष्ट्रसंत मोरारीबापू यांचा कॅम्प आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/560416858969381/
दिल्लीतून फोन आल्यानंतर उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्याची यंत्रणा मदतीला धावून आली. अधिकारी तातडीने चंचलकर यांच्यापर्यंत पोहचले. त्यांनी डोलीतून पत्नीला कॅम्पमध्ये हलवले व प्रथमेश यांना घोड्यावर बसवून कॅम्पपर्यंत आणले. पत्नीला सर्वतोपरी मदत केली व प्राथमिक उपचार केले. पर्वतावरून रातोरात खाली आणण्यात अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली. हे दाम्पत्य शनिवारी सोलापूरला सुखरूप पोहचले.
● पाटील घराण्याची परंपरा…
: गरीब व वंचितांना मदत करण्याची पाटील घराण्याची परंपरा आहे. सोलापुरात दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून उदयशंकर यांनी सामाजिक सेवेचा वसा घेतला आहे. चंचलकर पती-पत्नीवर संकट ओढवल्यानंतर या संपूर्ण काळात फोनवर त्यांच्यासोबत होते. प्रत्येक क्षणाला त्यांच्या खुशालीची माहिती घेत होते. तेथील अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्क ठेवून त्या पती-पत्नीची काळजी तर घेतलीच शिवाय उत्तराखंड प्रशासनाकडून मदत मिळवून दिली.
प्रतिष्ठानचे संस्थापक असणारे उदयशंकर यांचा उत्तर भारतातही घनिष्ठ संबंध व दांडगा जनसंपर्क आहे, याची प्रचिती या प्रसंगातून सोलापूरकरांना आली. अडचणीच्या वेळी कामी आला. त्यांनी आमच्यासाठी केलेली ही मदत आमच्या मनात कायम राहील. या सर्व मदतीबद्दल चंचलकर यांनी उदयशंकर व त्यांचे मानस भाचे असलेले पृथ्वीराज थोरात यांच्याविषयी चंचलकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
● असा हा योगायोग…
: माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग घडतात की, त्यात योगायोग पहायला मिळतो. चंचलकर दाम्पत्य शनिवारी केदारनाथ यात्रेला रवाना झाले. कठीण प्रसंगातून बाहेर पडत ते शनिवारीच सोलापूरला सुखरूप परतले. केदारनाथ हे श्रीभगवान शंकराचे स्थान. या देवावर देशाची अपार श्रद्धा. त्या देवाच्या पवित्र स्थानी चंचलकर कुटुंब अडचणीत आल्यानंतर सोलापूरच्या (उदय) शंकर ने मदतीसाठी धाव घेतली. असे योगायोग यानिमित्ताने सांगता येतील.
https://www.facebook.com/109399567404448/posts/560391258971941/