Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: India wins gold medal सोलापूरच्या रामजी कश्यपने महाराष्ट्र खोखो संघाला मिळवून दिले सुवर्णपदक खेलो इंडिया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

India wins gold medal सोलापूरच्या रामजी कश्यपने महाराष्ट्र खोखो संघाला मिळवून दिले सुवर्णपदक खेलो इंडिया

Surajya Digital
Last updated: 2022/06/14 at 10:42 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ 4 थी खेलो इंडिया खो – खो स्पर्धा□ रामजी कश्यपवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव !  स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ उपमुख्यमंत्री पवारांकडून अभिनंदन

□ 4 थी खेलो इंडिया खो – खो स्पर्धा

□ रामजी कश्यपवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव !  

वेळापूर :  भारत सरकार आणि भारत सरकारच्‍या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्‍या संयुक्त विद्यमाने ४ थी खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ पंचकुला, हरियाणा येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत  महाराष्ट्र खो-खो संघाचा कर्णधार रामजी कश्यप याने जिद्दीने खेळ दाखवून महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. Ramji Kashyap of Solapur Play India wins gold medal for Maharashtra Khokho team

काल सोमवारी पंचकुला हरियाणा येथे झालेल्या अंतिम  सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध आसाम मुलांचा खो-खो सामना झाला. यामध्ये महाराष्ट्र संघाने आसाम संघाचा १ डाव आणि ४ गुणाने पराभव करून सुवर्णपदक मिळवले या सामन्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील वेळापुरातील अर्धनारीनटेश्वर खो-खो क्लब चा सदस्य व इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी रामजी कश्यप याने १.५५ सेकंद संवरक्षण करून ४ गडी बाद केले व महाराष्ट्र खोखो संघाला विजय मिळवून दिला.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/560907008920366/

 

सदर महाराष्ट्र खो-खो संघाला पंचकुला हरियाणा येथे अखिल भारतीय खो-खो संघटनेचे महासचिव डाॅ. चंद्रजीत जाधव तसेच क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, क्रीडा मार्गदर्शक सय्यद व्हनकवडे सोलापूर यांचे मार्गदर्शन लाभले. रामजी कश्यप याला अर्धनारी मॅटर खो-खो क्लबचे क्रिडाशिक्षक सतीश कदम,  राष्ट्रीय प्रशिक्षक  सोमनाथ बनसोडे, वेळापुर उपसरपंच जावेद मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

रामजी कश्यप खो खो संघाचा कर्णधार याने महाराष्ट्र संघाला सुर्वण पदक  मिळवून दिल्याबद्दल   राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाचे नेते  व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  उत्तमराव जानकर,  वेळापूर सरपंच विमलताई जानकर, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रा. धनंजय साठे, धानोरे सरपंच जीवन जानकर अभिनंदन केले आहे .

——————————————

□ उपमुख्यमंत्री पवारांकडून अभिनंदन

हरयाणामधील पंचकुला येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल स्थान राखण्यासाठी महाराष्ट्राच्या टीमनं शर्थीचे प्रयत्न केले. खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ४५ सुवर्णपदकांसह १२५ पदकांची कमाई करत क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची मान उंचावली आहे. सलग तीन वर्षे ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अव्वल स्थान पटकवणाऱ्या महाराष्ट्राच्या टीममधील प्रत्येक खेळाडूंनी यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत जिगरबाज खेळ करत पदकांबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. राज्यातील प्रत्येकाला आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांसह त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!, अशी पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/560825625595171/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #RamjiKashyap #Solapur #PlayIndia #wins #goldmedal #Maharashtra #Khokho #team, #सोलापूर #रामजीकश्यप #महाराष्ट्र #खोखो #संघ #सुवर्णपदक #खेलोइंडिया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article National Herald case ईडीकडून राहुल गांधींची 8 तास चौकशी, उद्या पुन्हा बोलावले
Next Article सास-यावर तलवारीने हल्ला; जावयासह सहा जणांवर गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?