सोलापूर : पूर्व भागातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत आठजणांनी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. Markandey Cooperative Hospital election; Eight applications filed
पहिल्याच दिवशी कामगार चळवळीतील नेते अशोक इंदापुरे यांनी वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी दुस-या दिवशी वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघातून मनोहर अन्नलदास आणि अजय अन्नलदास यांनी अर्ज दाखल केला आहे. वैद्यकीय पात्रताधारक मतदारसंघातून डॉ. लता मिठ्ठाकोल यांनी तर महिला प्रतिनिधीमधून गीता मामड्याल व डॉ. लता मिठ्ठाकोल यांनी अर्ज दाखल केला आहे. संस्था सभासद मतदारसंघातून श्रीनिवास पडगे, मनोहर अन्नलदास यांनी अर्ज दाखल केला आहे. काल मंगळवारी ३० अर्जांची विक्री झाली.
मार्कंडेय रुग्णालयाच्या संस्था सभासद ५ जागा, वैयक्तिक सभासद ५, वैद्यकीय पात्रताधारक सभासद ३, महिला प्रतिनिधी अनुसूचित जाती/जमाती १, तर मागासवर्गीय प्रतिनिधी १, मुक्त जमाती/ भटक्या जाती/ विशेष मागास प्रवर्ग १ अशा एकूण १८ जागासांठी ही निवडणूक होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561660282178372/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यासाठी १७ जूनपर्यंत नवल पेट्रोलपंपाजवळील श्रीखंडे बंगला येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था, उत्तर सोलापूर यांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल अर्जांची छाननी २० जून दाखल अर्जांची छाननी २० जून रोजी करण्यात येणार आहे. ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. १७ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए.गावडे हे काम पाहत होत आहे.
मार्कंडेय रुग्णालय ही पूर्व भागातील एक मोठी सहकारी येथे गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात उपचार केले जातात. सध्या या रुग्णालयावर ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली हे प्रेसिडेंटपदी तर डॉ. माणिक गुर्रम हे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. या रुग्णालयावर संचालक म्हणून काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारी पहिल्या दिवशी ८३ अर्जांची विक्री झाली होती.
दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बोल्ली यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पूर्व भागातून होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561279038883163/