□ पीकपाणी वार्तापत्र…..
अक्कलकोट – खरीप मध्ये प्रामुख्याने तूर, सोयाबीन,मूग, उडीद, मका बाजरी, सुर्यफुल आदी पिके घेतली जातात. परंतू सध्या तालुक्यात दमदार पाऊस पडत नसल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. अर्धा जून महिना संपत आला तरी तालुक्यात वरुणराजाचे दमदार आगमन होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी मात्र चिंतातूर झाल्याचे पहायला मिळत आहे. Akkalkot: Baliraja waiting for heavy rains; Farmers worried about crop water
अक्कलकोट तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1 लाख 41 हजार 880 हेक्टर आहे, त्या पैकी पेरणी दायक लागवडी योग्य 1 लाख 31 हजार 604 हेक्टर क्षेत्र आहे. आणि सध्या खरीप पिकाखाली 65 हजार 225 हेक्टर क्षेत्र योग्य आहे.
यंदा हवामान अंदाजानुसार शेतकरी खरिपाची तयारी करुन बसले आहेत. तर बागायत शेतक-यांना पाणी कमी पडत असल्याने ऊस, फळबाग आदी बागायत पीक मात्र वाळून चालले आहे. सध्या जमिनीत उष्णता असल्याकारणाने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. अशा कमी पावसावर पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होते. मग दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे पुरेशी ओलं झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन तालुका कृषि कार्यालयाकडून केली जात आहे.
परंतू इकडे पेरणीला उशीरा होत असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. तालुका कृषि कार्यालयाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. तर शेतकरी तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा करताना दिसत आहे. यंदा हवामान अंदाजानुसार तालुक्यात पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता, परंतू हा अंदाज आता कुठेतरी फोल ठरतोय की काय अशी भीती शेतकर्यामध्ये आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/561045935573140/
तालुक्यात सतत दोन वर्षे वरुणराजा मनसोक्त बरसल्याने तालुक्यातील नदी,नाले,ओढे व तलाव ओव्हर फ्लो झाले होते. यंदा मात्र तालुक्यात फक्त वादळी वारे व उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा सध्या धास्तावला आहे. दररोज तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून वरुणराजाची प्रतिक्षा करत आहे. परंतू तालुक्यात वरुणराजाचे दर्शन मात्र होत नाही. आकाशात फक्त ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे.
तालुक्यात दमदार पाऊस पडताना दिसेना. तालुक्यात तडवळ व वसंतराव नाईक नगर भागात मात्र मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने या भागात काही प्रमाणात खरीप पेरण्या होत आहेत. बाकी तालुक्यातील संपूर्ण भाग मात्र अजून ही कोरडा ठाक पडला आहे. तालुक्यात अजूनही बहुसंख्य भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने या भागातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
》शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये. कारण सध्या जमिनीत उष्णता असल्याकारणाने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशा कमी पावसात पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होईल –
रामचंद्र माळी – प्रभारी तालुका कृषी अधिकारी (अक्कलकोट)
》 सध्याच्या घडीला तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. जमिनीत ओलावा कमी आहे. यामुळे खत बी-बियाणे विक्री होताना दिसत नाही. याचाच परिणाम यंदा कृषी सेवा केंद्रावर होत आहे.
प्रो प्रा तुकाराम मोरे
आबा कृषी सेवा केंद्र (अक्कलकोट)
》 यंदा वसंतराव नाईक नगर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने सध्या या भागात खरीप पेरणी सुरु आहे. गत वर्षाप्रमाणेच यंदाही आमच्या भागात वेळेवर पाऊस झाल्याने वेळेवर पेरणी होत आहे.
सचिन जाधव, शेतकरी ( वसंतराव नाईक नगर तांडा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/561279038883163/